PBKS vs CSK Yuzi Chahal Copyright: भारताचा आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने बुधवारी, अब्जाधीश आणि X चे मालक इलॉन मस्क यांना टॅग करून चक्क एक कॉपीराईट उल्लंघनाची तक्रार केली आहे. चहलने मस्कला पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलवर कॉपीराईट स्ट्राइक लावण्यास सांगत ही पोस्ट केली. नेमकं असं झालं तरी काय की, एरवी हसत खेळत असणारा चहल आपली तक्रार घेऊन थेट मस्ककडे गेलाय, चला बघूया..

झालं असं की, पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात एक झेल टिपल्यानंतर पंजाबचा वेगवान गोलंदाज वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आडवं झोपून विकेटचा आनंद साजरा केला. तुम्हाला फोटो पाहिल्यावर लगेचच लक्षात येईल की भारताच्या एका सामन्यात चहल जेव्हा खेळाडूंना पाणी देण्यासाठी मैदानात जाण्याच्या ड्युटीवर होता तेव्हा सीमारेषेच्या जवळ अशाच पद्धतीने झोपून राहिल्याचा त्याचाही एक फोटो व्हायरल झाला होता. इतकं की अनेकांनी यावर मीम्स बनवून चहलचा कूलनेस कौतुकाने शेअर केला होता. याच फोटोचा संदर्भ देत चहलने याही वेळेस गमतीत हर्षलने आपली कॉपी केल्याचे म्हणत इलॉन मस्ककडे कॉपीराईट स्ट्राईकसाठी मजेशीर विनंती केली आहे.

MP Chirag Paswan Leaked Video
कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांच्या लीक क्लिपमुळे खळबळ, मोदींवरही होतेय टीका! Video मध्ये काय व कधी घडलं?
IND vs PAK Match Mohammed Siraj aggressive throw hits Rizwan Hand
VIDEO : ‘भाई ये क्या कर दिया…’, सिराजने मुद्दाम रिझवानला चेंडू मारला? चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल
Why Azam Khan Getting Trolled
आझम खान: घराणेशाहीचा आरोप होणारा वजनदार खेळाडू का होतो ट्रोल?
Rohit Sharma breaks Dhoni's record
IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार
Shashi Tharoor Exit polls Congress Opposition performance loksabha elextion 2024
एक्झिट पोल्स फारच हास्यास्पद! आमच्या कामगिरीत किमान सुधारणा तरी होईलच : शशी थरूर
Man touched a woman in a crowded DTC bus
गर्दीचा फायदा घेत बसमध्ये महिलेला नको त्या जागी स्पर्श; महिलेने इशारा दिल्यानंतरही त्याने…तरुणाचा संतापजनक VIDEO व्हायरल
INDIA bloc leaders meeting Mallikarjun kharge forcasts 295 for INDIA
एक्झिट पोल्सवर विश्वास नाही; आम्ही २९५ च्या पार जाऊ – इंडिया आघाडीचा दावा
Sunil Chhetri retirement marathi news
सुनील छेत्री आम्हाला समजलाच नाही…

“प्रिय @elonmusk paaji, हर्षल भाई पे कॉपीराइट लगाना है.” असे कॅप्शन देत स्वतः चहलने हा फोटो शेअर केला होता.

नेटकऱ्यांचा चहलला मजेशीर पाठिंबा

पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे ३० एप्रिलला भारताच्या T20 विश्वचषक संघाची सुद्धा घोषणा करण्यात आली. प्रोव्हिजिनल संघात स्थान मिळालेल्या चहलचा आनंद त्याच्या हसऱ्या खेळत्या पोस्टमधून पाहायला मिळतोय असं म्हणायला हरकत नाही.

आयपीएल पॉईंट टेबल

दरम्यान, पंजाब किंग्जने बुधवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा ७ गडी राखून पराभव केला. ज्यामुळे संघाच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टोच्या ३० चेंडूंत ४६ धावा आणि रायली रुसोच्या २३ चेंडूंत ४३ धावांमुळे पीबीकेएसला १७.५ षटकांत विजय आपल्या नावावर करता आला आहे.