राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, गुरुराजा आणि मीराबाई चानूने पदकांची कमाई केल्यानंतर दुसरा दिवसही भारतासाठी आनंदाचा ठरला आहे. शुक्रवारी सकाळी वेटलिफ्टर संजिता चानूने ५३ किलो वजनी गटात भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. या स्पर्धेतलं भारताचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं आहे. स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये संजिताने १९२ किलो वजन उचलले. गत राष्ट्रकुलमध्येही संजिता चानूने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते.

दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात आणि कोणता खेळाडू भारतासाठी पदक मिळवतो याची संपूर्ण माहिती तुम्ही लोकसत्ता.कॉमवर पाहू शकणार आहात.

  • ४६-४९ किलो वजनी गट बॉक्सिंग प्रकारात भारताचा अमित पुढच्या फेरीत, घानाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवलं
  • स्क्वॅशमध्ये भारतासाठी संमिश्र निकाल – ज्योत्सना चिनप्पा पुढच्या फेरीत मात्र दिपीका पल्लिकल पराभूत
  • सांघिक बॅडमिंटनमध्ये भारताची स्कॉटलंडवर मात, ५-० ने उडवला धुव्वा
  • भारताच्या खात्यात आणखी एक पदक, भारताची एकूण पदकं २ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य
  • ६९ किलो वजनी गटात भारताच्या दिपक लाथेरला कांस्यपदक
  • भारताच्या वेटलिफ्टीर्सकडून आणखी एक आश्वासक कामगिरी
  • महिला हॉकी – भारतीय महिलांची मलेशियावर मात, ४-१ ने केला पराभव
  • स्क्वॅश – विक्रम मल्होत्रा इंग्लंडच्या निक मॅथ्यूकडून १-३ ने पराभूत
  • बॉक्सिंग –  ९१ किलो वजगी गटात भारताचा नमन तवंर पुढच्या फेरीत, टांझानियाच्या बॉक्सरवर केली मात
  •  महिला जलतरणपटू किरण टाक १०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात पुढच्या फेरीत
  • ५३ किलो वजनी गटात भारताची आणखी एक सुवर्ण कामगिरी
  • ५३ किलो वजनी गटात भारताच्या संजिता चानूने पटकावलं सुवर्णपदक
  • दुसऱ्या दिवशी भारताला आणखी एक सुवर्णपदक