चेन्नई : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा ध्वजवाहक म्हणून टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलची नियुक्ती करण्यावरून वाद वाढतच आहे. तमिळनाडू अ‍ॅथलेटिक्स संघटनेने तर कमालला सामान्य दर्जाचा खेळाडू असे संबोधले असून, त्याच्या जागी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राची ध्वजवाहक म्हणून निवड व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >>> IPL 2024 LSG vs PBKS: लखनऊ संघाने मिळवला यंदाच्या हंगामातील पहिला विजय; पदार्पणवीर मयंक यादव ठरला विजयाचा नायक

what Saina Nehwal Said?
“मग मी काय करायला हवं होतं?”, बॅडमिंटन स्टार सायना नेहवालचा ‘त्या’ वक्तव्यावरुन काँग्रेसला थेट प्रश्न
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Sharad Pawar
शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडेंविरोधात उभा केला तगडा उमेदवार
Sunny Deol dropped from Gurdaspur
Lok Sabha Election: सनी देओलचा पत्ता कापला, भाजपाच्या आठव्या यादीत किती नावं? कुणाला मिळालं तिकिट?

भारताची जागतिक पदक विजेती लांब उडीपटू आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्सची उपाध्यक्ष अंजू बॉबी जॉर्जनेही काही दिवसांपूर्वी अशीच मागणी केली होती. ‘‘भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ध्वजवाहकाची नियुक्ती करण्यात घाई केली. नीरज चोप्राला डावलून शरथला हा सन्मान दिल्यामुळे देशभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एका सामान्य खेळाडूच्या नेतृत्वाखाली चोप्राचा सहभाग ही कल्पनाच करू शकत नाही,’’ असे तमिळनाडू अ‍ॅथलेटिक्स संघटनेने म्हटले आहे. ‘आयओए’च्या पदाधिकाऱ्याने मात्र शरथच्या नियुक्तीचे समर्थन केले आहे. ‘‘ऑलिम्पिक नियमानुसार कुठल्याही खेळाडूला त्याच्या स्पर्धेपूर्वी सात दिवस आधी ऑलिम्पिक क्रीडा ग्राममध्ये प्रवेश मिळत नाही. नीरजचा भालाफेक स्पर्धा प्रकार ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, तर उद्घाटन सोहळा २६ जुलैला होणार आहे. त्यामुळे नीरजला २५ जुलैला पॅरिसला यावे लागेल आणि उद्घाटनानंतर पुन्हा त्याच्या सराव स्थळावर जावे लागेल किंवा पॅरिसमध्येच हॉटेलमध्ये रहावे लागेल. या सर्व बाबी विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नीरजकडून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची अपेक्षा असल्यामुळे त्याच्या अखेरच्या टप्प्यातील सरावात अशा प्रकारे अडथळा आणणे योग्य नाही,’’ असे या पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.