करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही अंशी लोक करोनातून पूर्णपणे बरे होत आहेत. करोनाचा फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. याच दरम्यान क्रीडाक्षेत्रातून एक वाईट बातमी आली आहे. करोनाची लागण झालेल्या एका माजी क्रिकेटपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

“मोदी सरकार म्हणजे…”; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जफर सर्फराज यांचे करोनामुळे निधन झाले. काही दिवसांपूर्वी ते करोना पॉसिटिव्ह आढळले होते. पेशावर येथील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गेली तीन दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, मात्र अखेर त्यांची करोनाशी झुंज अपयशी ठरली. सर्फराज हे पाकस्तानातील करोनाशी झुंज देताना मृत्यू पावलेले पहिले व्यावसायिक क्रिकेटपटू ठरले. ते ५० वर्षांचे होते.

अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला हवेत भारत-पाक सामने

सर्फराज यांनी पेशावर संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९८८ मध्ये पदार्पण केले. त्यांनी पेशावर संघाकडून १५ प्रथम श्रेणी सामन्यात ६१६ धावा केल्या. ६ एकदिवसीय सामन्यात ९६ धावा करून ते १९९४ साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका पार पडली. त्यांनी पेशावरच्या वरिष्ठ आणि १९ वर्षाखालील युवा संघांना प्रशिक्षण दिले. जफर हे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघातील माजी खेळाडू अख्तर सर्फराज यांचे बंधू होते.

“रामायणातील ‘या’ योद्ध्याकडून मिळाली बॅटिंगची प्रेरणा”

आतापर्यंत पाकिस्तानातील अंदाजे १०० लोक करोनाचे बळी ठरले आहेत.