‘आयसीसी’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अ‍ॅलेक्स मार्शल यांचा इशारा

लंडन : करोनामुळे मैदानावरील सामने थांबल्यामुळे क्रि के टपटू अधिक वेळ समाजमाध्यमांवर घालवत आहेत. हीच संधी साधून काही भ्रष्ट व्यक्ती क्रिकेटपटूंशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा आंतरराष्ट्रीय क्रि के ट परिषदेच्या (आयसीसी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अ‍ॅलेक्स मार्शल यांनी के ला आहे.

करोनामुळे जगभरात टाळेबंदीची स्थिती असल्यामुळे १५ मार्चपासून स्पर्धात्मक क्रि के ट सामने स्थगित झाले आहेत. पाकिस्तान सुपर लीग ही स्थगित झालेली अखेरची क्रि के ट स्पर्धा ठरली. क्रि के टक्षेत्राला धोक्याचा इशारा देताना मार्शल म्हणाले, ‘‘क्रिकेटपटू सध्या मोकळे असल्यामुळे आपला अधिक वेळ समाजमाध्यमांवर घालवत आहेत. नेमकी हीच संधी साधून भ्रष्ट विचारसरणीचे सट्टेबाज किं वा निकाल निश्चिती करणारी मंडळी क्रि के टपटूंशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. कारण याच संबंधांतून भविष्यात त्यांना भ्रष्टाचार करता येऊ शके ल.’’

मैदानावरील क्रिकेट थांबले असले, तरी त्यासंबंधांतील भ्रष्टाचार थांबलेला नाही, हे मांडताना मार्शल म्हणाले, ‘‘करोना विषाणूच्या संसर्गामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रि के ट सामने तात्पुरत्या स्वरूपात थांबले आहेत. परंतु भ्रष्टाचार करणारे व्यक्ती मात्र कार्यरत आहेत. आम्ही ‘आयसीसी’चे सदस्य, खेळाडू यांना या भ्रष्टाचारासंबंधात जाणीव करून देत असतो.’’

‘‘करोनामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत काही जण संधी साधू शकतात. त्यामुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे असेल,’’ असे मत इंग्लंड आणि वेल्स क्रि के ट मंडळाच्या एकात्मता विभागाचे प्रमुख जेम्स पायमाँट यांनी व्यक्त के ले.

भारतीय क्रिकेटपटू संशयास्पद घटनांची त्वरित माहिती देतात -अजित सिंग

नवी दिल्ली : करोनामुळे देशात टाळेबंदीची स्थिती असल्यामुळे क्रि के टपटूंशी भ्रष्टाचाराच्या उद्देशाने संपर्क होण्याचा धोका आहे. परंतु भारतीय क्रि के टपटूंना भ्रष्ट व्यक्तींच्या कार्यपद्धतीची पुरेशी जाणीव आहे आणि संशयास्पद घटनांची ते त्वरित माहिती देतात, असे भारतीय क्रि के ट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले. ‘‘आम्ही भारतीय खेळाडूंना भ्रष्ट व्यक्ती समाजमाध्यमांद्वारे कशी कार्यपद्धती राबवतात, याची पुरती जाणीव करून दिली आहे. निकाल निश्चिती करणारे किं वा सट्टेबाज कशा प्रकारे संपर्क साधतात आणि प्रस्ताव ठेवतात, हे त्यांना पटवून दिले आहे,’’ असे माजी पोलीस अधिकारी अजित सिंग यांनी सांगितले. ‘‘सुरुवातीला ह्य़ा भ्रष्ट व्यक्ती चाहत्याप्रमाणेच वागतात. मग तुमच्या एखाद्या परिचित व्यक्तीमार्फत भेटतात. हीच कार्यपद्धती ते प्रामुख्याने वापरतात. त्यामुळे क्रिकेटपटूंना अशी संशयास्पद व्यक्ती संपर्कात आल्यास, ते त्वरित याची माहिती देतात,’’ असे अजित सिंग यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांतील माझ्या कामकाजाद्वारे सांगतो की, सध्याचे भारतीय क्रि के टपटू हे प्रामाणिक असून, त्यांना जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे, असे अजित सिंग आवर्जून म्हणाले

करोनामुळे सामन्यांची संख्या कमी झाल्यामुळे क्रि के टपटूच्या अर्थकारणातही फरक पडला आहे. त्यामुळे पैशाच्या लोभापायी क्रिकेटपटू भ्रष्टाचाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडण्याची शक्यता अधिक आहे.

-अ‍ॅलेक्स मार्शल, ‘आयसीसी’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख