आयपीएलनंतर आगामी टी-२० विश्वचषकावर सर्वांच्या नजरा आहेत. गेल्या दशकभरात भारताने एकही आयसीसी ट्रॉफी पटकावलेली नाही, त्यामुळे या टी-२० विश्वचषकावर भारत आपलं नाव कोरेल अशी सर्वांना आशा आहे. पुढील विश्वचषक डोळ्यासमोर असतानाही सर्वांच्याच मनात २०२३ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकाचा अंतिम सामन्यातील पराभव अजूनही तसाच आहे. विश्वचषकाचे जेतेपद मिळवण्यापासून एक पाऊल दूर असलेल्या भारताला ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट कामगिरी करत नमवले आणि भारताला न पचवणारा धक्का दिला. पण या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने कशी तयारी केली होती, कोणते डावपेच आखले होते, हे आता डेव्हिड वॉर्नरने सांगितले आहे.

आर अश्विनने त्याच्या युट्युब चॅनलवर डेव्हिड वॉर्नरसोबतच्या मुलाखतीचा व्हीडिओ शेअर केला आहे. अश्विनने ‘कुट्टी स्टोरीज विथ अॅश’ या सिरीजमध्ये अनेक क्रिकेटपटूंची मुलाखत घेतली आहे. यामध्ये आज त्याने वॉर्नरची मुलाखत घेतली आणि ज्याचा व्हीडिओ त्याने शेअर केला आहे. यामध्ये वॉर्नरने अनेक विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. भारत आता दुसरं घर असल्याचा उल्लेखही त्याने केला, तर सोबतच आयपीएलचा भारतात सामने खेळताना कसा फायदा होतो, हेही त्याने सांगितले. वनडे वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाच्या रणनीतीबद्दलही त्याने सांगितले.

PCB Chairman Mohsin Naqvi Upset With Pakistan Team
IND vs PAK : “पाकिस्तान संघाला आता ‘मेजर सर्जरीची’ गरज…”, भारताविरुद्धच्या पराभवानंतर पीसीबीचे अध्यक्ष संतापले
David Warner going to Oman dressing room after dismissed
T20 WC 2024 : अरे हे काय! आऊट झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर ओमानच्या ड्रेसिंग रूमकडे निघाला, VIDEO होतोय व्हायरल
Pat Cummins triggers Virat Kohli fans as 'jobless' video surfaces online: 'Say anything about him and watch out'
VIDEO : विराट कोहलीच्या चाहत्यांवर पॅट कमिन्स संतापला; म्हणाला, “सर्वच्या सर्व चाहते…”
West Indies beat Australia in warm up match
T20 WC 2024 : वर्ल्डकपपूर्वी वेस्ट इंडिजने केला ऑस्ट्रलियाचा पालापाचोळा; २० षटकात २५७ धावा, पूरनचे वादळी अर्धशतक
Natasa Stankovic Spotted with Mystery man
नताशा स्टॅनकोव्हिकबरोबरचा मिस्ट्री मॅन कोण? हार्दिकशी घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच कॅमेर्‍यासमोर; VIDEO व्हायरल
watermelon in cannes
Watermelon at Cannes: हमास-इस्रायल युद्धादरम्यान कलिंगड कसे ठरले पॅलेस्टाईन एकतेचे प्रतीक?
Mark Boucher asked Rohit Sharma what's next
Mumbai Indians : मार्क बाऊचरने भविष्याबद्दल विचारताच रोहित शर्माने दिले एका शब्दात उत्तर; म्हणाला…
Rohit sharma Requests cameraman to mute audio while shooting Video Viral
MI vs LSG: “आधीच माझी वाट लावली आहे…” कॅमेरामॅनला पाहताच रोहित शर्माने जोडले हात, VIDEO होतोय व्हायरल

वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अनपेक्षित कामगिरी करत भारताला नमवले. वॉर्नर याविषयी सांगताना म्हणाला, “ऑस्ट्रेलियन गेम प्लॅन भारतात वापरणं. अहमदाबाद आणि मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड यांच्यात साम्य आहे. दोन्ही मैदानं प्रचंड आकाराची आहेत. सीमारेषा दूरवर आहे. चौकार-षटकार मारणं कठीण आहे. त्यामुळे एकेरी-दुहेरी धावांवर भर द्यावा लागतो. वर्ल्डकप फायनलला आम्ही एमसीजीवर खेळताना जे डावपेच आखतो तसेच अहमदाबादमध्ये आखले. चेंडू खेळून दोन धावा काढायचा. गोलंदाजी करताना छातीच्या दिशेने मारा करायचा आणि मोठ्या बाऊंड्रीजना लक्ष्य करणं हे डावपेच होते. आयपीएलमुळे खेळपट्ट्या, प्रेक्षक वर्ग समजून घेण्यास मदत मिळाली. काळ्या मातीची खेळपट्टी आणि लाल मातीची खेळपट्टीमधील फरक समजून घेण्यास मदत झाली.”