भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) अधिपत्याखाली आल्यानंतर मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत या मुद्दय़ावर तसेच आगामी निवडणुकांविषयी चर्चा होणार आहे.

बीसीसीआयच्या आचारसंहितेत आता ‘नाडा’च्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश कसा करावा, याविषयीही चर्चा केली जाणार आहे. उत्तेजकांविषयी कोणतीही हयगय केली जाणार नाही, अशी भूमिका प्रशासकीय समितीची असल्यामुळे या मुद्दय़ावर प्रदीर्घ चर्चा होण्याची अपेक्षा आहे. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत डायना एडल्जी आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) रवी थोडगे या सदस्यांचा समावेश आहे.