सॉकर मॅनिया
नितीन मुजुमदार – response.lokprabha@expressindia.com

जर्मनीचा मातब्बर संघ साखळी स्पर्धेतच बाहेर फेकला जाणं.. अर्जेटिनाला स्पेनने तर पोर्तुगालला उरुग्वेने दिलेला दणका..मेस्सी आणि रोनाल्डोची या विश्वचषकातली कामगिरी.. आणि कियन एम्बपेचा उदय ही आत्तापर्यंतच्या स्पर्धाची बेरीज-बजाबाकी म्हणता येईल.

रशियात चालू असलेली २१ वी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरुवातीपासूनच अनेक धक्कादायक निकालांनी चच्रेत आहे. साखळी स्पध्रेत जर्मनीचा संघ स्पध्रेबाहेर फेकला गेला तर आता बाद फेरीत पहिल्या तीन सामन्यांमध्ये अर्जेटिना, पोर्तुगाल व स्पेन हे पहिल्या १० रँकिंग्जमध्ये असलेले संघ पराभूत झाले आहेत. या संघांपकी पोर्तुगाल वगळता सर्व संघांनी विश्वचषक किमान एकदा तरी जिंकलेला आहे. जर्मनीने चार वेळा, अर्जेटिनाने दोन वेळा तर स्पेनने अलीकडे म्हणजे २०१० साली विश्वचषक जिंकलेला आहे. या चौघांपकी सर्वात धक्कादायकरीत्या स्पध्रेतून बाहेर फेकला गेला तो जर्मनीचा संघ. आतापर्यंत एकूण २० विश्वचषक फुटबॉल स्पर्धा खेळल्या गेल्या व त्यापकी तब्बल आठ अंतिम सामन्यांत (विजेते-१९५४, १९७४, १९९०, २०१४ उपविजेते- १९६६, १९८२, १९८६, २००२) जर्मनीचा संघ खेळला यावरून त्यांचे स्पध्रेबाहेर फेकले जाणे तेही साखळी स्पध्रेतच किती धक्कादायक होते याचा अंदाज येईल. आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात स्वीडन विरुद्ध अखेरच्या काही मिनिटांमध्ये आक्रमक खेळ करून कसाबसा विजय जर्मनीने मिळवला खरा पण अखेरच्या साखळी सामन्यात कोरियाने त्यांना २-०असे नमवून  इतिहास घडविला.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत पहिल्याच दिवशी आणखी दोन धक्कादायक निकाल फुटबॉल जगताने बघितले. १९७८ व १९८६ साली विश्वचषक जिंकलेल्या अर्जेटिनाला फ्रान्सने अतिशय चुरशीच्या सामन्यात ४-३ असे हरवून घरी पाठवले तर दुसऱ्या सामन्यात पोर्तुगालला उरुग्वेने २-१ असा दणका दिला. उरुग्वेच्या संघाने दोन वेळा विश्वचषक जिंकलेला असला तरी पोर्तुगालचे वर्ल्ड रँकिंग्ज चौथे होते तर उरुग्वेचे चौदावे.

बाद फेरीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यात यजमान रशियाने २०१० साली विश्वचषक जिंकलेल्या स्पेनला पेनल्टी शूट आऊटवर हरवून यजमानांचे आव्हान कायम ठेवले व विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य पूर्व फेरीत प्रथमच प्रवेश केला. रशियाने या स्पध्रेसाठी स्वदेशी प्रशिक्षक स्टेनिस्लाव चेष्रेसोवला करारबद्ध केले होते कारण फॅबीओ कॅपेलो व गुरुस हिद्दीन्क या महागडय़ा परदेशी प्रशिक्षकांबाबत रशियाचा अनुभव चांगला नव्हता. चेष्रेसोव हा स्वत: माजी गोलकीपर असून डिफेन्सिव्ह व्यूहरचनेवर त्याचा भर असतो. रशियाचा संघ ज्या गटात होता तो गट देखील तुलनात्मकदृष्टय़ा सोपा होता, त्यामुळे रशियाचे बाद फेरीत प्रवेश करणे अपेक्षित होते. मात्र रशियाचा एकेकाळच्या विश्वविजेत्या स्पेनवरील विजय मात्र पूर्णपणे अनपेक्षित होता. आणखी एका बाद फेरीच्या सामन्यात क्रोएशियाने डेन्मार्कलादेखील पेनल्टी शूट आऊटवर हरविले.

या स्पध्रेत दोन महान फुटबॉलपटू आपला फार प्रभाव पाडू शकले नाहीत. कधी ते स्वत: खेळ उंचावू शकले नाहीत तर कधी त्यांना सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. अर्जेटिनाचा मेस्सी व पोर्तुगालचा रोनाल्डो हे ते दोन सुपरस्टार फुटबॉलपटू. प्रदीर्घ काळ या दोघा महान खेळाडूंच्या खेळाची छाया जागतिक फुटबॉलवर पडलेली आहे. या दोन्ही खेळाडूंच्या कारकीर्दीतील दुर्दैवी भाग म्हणजे दोघांनीही विश्वचषक स्पध्रेतील बाद फेरीत गोल केलेला नाही. रोनाल्डोने आतापर्यंत एकूण सहा विश्वचषक बाद फेरीचे सामने खेळले व त्यात ५१४ मिनिटांत २५ शॉट्स त्याने गोलपोस्टच्या दिशेने मारले व त्यात त्याला एकही गोल नोंदविता आला नाही. लिओनेल मेस्सीने आतापर्यंत आठ विश्वचषक बाद फेरीचे सामने खेळले त्यात ७५६ मिनिटांत त्याने गोलपोस्टवर २३ शॉट्सच्या साहाय्याने आक्रमणे केली मात्र नावावर गोल शून्य !! या खेळाडूंच्या ‘ग्रेटनेस’बद्दल कोणाला काहीही शंका नाही. त्यांच्या संघातील इतर खेळाडू अनेक वेळा मोक्याच्या वेळी आपला खेळ उंचावू शकले नाहीत हेही तितकेच खरे! मेस्सीने फ्रान्स विरुद्ध दोन महत्त्वाच्या ‘असिस्ट्स’मध्ये सहभाग नोंदविला. सलग चार विश्वचषक स्पर्धामध्ये त्याने ही कामगिरी केली आहे व ही कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू. उरुग्वेविरुद्ध रोनाल्डोही कमनशिबी ठरला. त्या सामन्यात त्याने गोलपोस्टवर सहा शॉट्स मारले, पकी एक गोलात रूपांतरित झाला. याउलट प्रतिस्पर्धी उरुग्वेने सर्व मिळून पाच शॉट्स गोलपोस्टवर अटेम्प्ट केले. मात्र याच सामन्यात तो १८ यार्ड बॉक्समध्ये पहिल्या हाफमध्ये डिएॅगो गोदीन आणि कंपनीच्या कडक पहाऱ्यामुळे फुटबॉलला स्पर्शही करू शकला नाही!! लिओनेल मेस्सी व क्रिस्तीयानो रोनाल्डो या दोघाही सुपरस्टार्सची वये आता अनुक्रमे ३१ वष्रे व ३३ वष्रे अशी आहेत. त्यामुळे हे दोघेही पुन्हा विश्वचषकात खेळताना दिसण्याची शक्यता धूसर आहे असे जाणकार म्हणतात. २०१६ साली निवृत्ती घेतलेल्या मेस्सीचे हे पुनरागमन त्याच्या स्वत:साठी नक्कीच क्लेशदायक ठरले असणार. अर्जेटिनाच्या आइसलॅण्ड विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात तो पेनल्टी रूपांतरित करू शकला नाही. क्रोएशियाविरुद्ध देखील राष्ट्रगीताच्या वेळी मेस्सी तणावात दिसला असे बीबीसीच्या अ‍ॅमा सॅण्डर्सने लिहिले आहे. २००६ च्या विश्वचषक स्पध्रेत हे दोघेही प्रथम खेळले आणि बरोबर २१ वर्षांनी या विश्वचषकात स्वत:च्या महानतेचे ओझे त्यांच्या कामगिरीतही प्रतििबबित झालेले दिसले!

रोनाल्डोसाठी हा विश्वचषक काहीसा मेस्सीसारखाच गेला. स्पेनविरुद्ध हॅट्ट्रिक करत त्याने आपल्या विश्वचषक कॅम्पेनची सुरुवात दिमाखदार केली. मोरोक्कोविरुद्धही त्याने संघाला विजय मिळवून दिला. इराणविरुद्ध मात्र तो पेनल्टी रूपांतरित करू शकला नाही व त्याला २ील्ल३ ऋ करायची देखील वेळ आली होती. बाद फेरीत मात्र त्याची अवस्था उरुग्वेने बिकट केली. त्याच्यावर करडी नजर ठेवली व त्याला तोलामोलाची साथही मिळाली नाही. पाच फेब्रुवारी १९८५ रोजी जन्मलेल्या रोनाल्डोने चार विश्वचषकांमध्ये १७ सामन्यांमध्ये सात गोल नोंदवून विश्वविक्रम केला आहे. मात्र विश्वचषक विजेत्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी त्याला परत मिळण्याची शक्यता कमीच. पोर्तुगाल फुटबॉल संघाचे कोच फर्नाडो सॅन्तोस मात्र तो अजून काही काळ तरी खेळेल याबाबत आशावादी आहेत. ‘सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वएाअ  राष्ट्रांच्या स्पध्रेत तो आमच्याबरोबर असेल’ असे ते म्हणतात. रोनाल्डोच्याही कारकीर्दीचा सूर्य मेस्सीसारखाच मावळतीला लागला आहे. ‘मेस्सी, फुटबॉल इतिहासातील कदाचित सर्वात महान खेळाडू असा मायदेशी परत जाताना मनाला वेदना होत आहेत’  हे स्पॅनिश फुटबॉलतज्ज्ञांचे उद्गार रोनाल्डोलाही तंतोतंत लागू होतात!

फुटबॉलमधील हे दोन सर्वकालीन महान खेळाडू उतरणीला लागले असताना काही नवोदितांनीही आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्सचा १९ वर्षीय कियान एम्बपे हा एक उमदा फॉरवर्ड. अर्जेटिनाविरुद्ध बाद फेरीत दोन गोल नोंदवून त्याने १९५८ साली पेलेने केलेल्या विक्रमाची बरोबरी केली. विश्वचषकात एका सामन्यात १९ वर्षीय खेळाडूने दोन गोल नोंदविणे तेही बाद फेरीच्या सामन्यात ही खचितच साधी बाब नाही. याआधी अशी घटना तब्बल ६० वर्षांपूर्वी घडली होती यावरून या घटनेचे महत्त्व लक्षात यावे. काही फुटबॉल जाणकारांना १९९८ मध्ये मायकेल ओवेनने अर्जेटिनाविरुद्ध केलेल्या गोलची आठवणही या प्रसंगाने झाली!! अर्जेटिनाविरुद्ध फ्रान्सने पहिला गोल केला तेव्हा एम्बपेने सात सेकंदांत ७७ यार्ड्स अंतर कापले होते आणि तेव्हा त्याचा सर्वाधिक वेग होता ३८ मल प्रति तास!!!

विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने सहा जुलपासून खेळले जातील. दिवसेंदिवस त्यातली चुरस वाढत जाणार आहे हे नक्की.
सौजन्य – लोकप्रभा