अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत आश्चर्यकारक कामगिरी केली. लिओनेल मेस्सीने फ्रान्सविरुद्ध पूर्वार्धात गोल करत इतिहास रचला. शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या लिओनेल मेस्सीने पेनल्टी दरम्यान गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.सामन्याच्या २३व्या मिनिटाला पेनल्टीवर लिओनेल मेस्सीने आपल्या संघासाठी गोल केला. अर्जेंटिनाच्या कर्णधाराने शॉर्ट रनअप घेत चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. फ्रेंच गोलकीपरने त्याच्या उजवीकडे डायव्ह केला, पण चेंडू उलट गेला.

फ्रान्सला ८०व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली, ती स्टार खेळाडू कायलियन एमबाप्पेने घेतली. गोलरक्षक मार्टिनेझ पूर्णपणे तयार होता, पण एम्बाप्पेचा फटका तो रोखू शकला नाही. अशाप्रकारे फ्रान्सने पहिला गोल नोंदवून सामन्यात पुनरागमन केले आहे. त्याने पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल करून सामना बरोबरीत आणला.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू

Fifa World Cup 2022 Final: एकाच विश्वचषकात प्रत्येक फेरीत ‘ही’ कामगिरी करणारा मेस्सी ठरला एकमेव खेळाडू

या स्फोटक गोलबरोबरच लिओनेल मेस्सीने इतिहासही रचला. विश्वचषकादरम्यान त्याने आतापर्यंत २० गोल केले आहेत. या कालावधीत त्याने १२ गोल केले आहेत, तर ८ गोलांना मदत केली आहे. या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर लिओनेल मेस्सीचा हा सहावा गोल होता.

फिफा विश्वचषक २०२२ मध्ये लिओनेल मेस्सीने केलेले गोल –

१.सौदी अरेबिया (पेनल्टी)
२.मेक्सिको
३.ऑस्ट्रेलिया
४.नेदरलँड्स (पेनल्टी)
५.क्रोएशिया (पेनल्टी)
६.फ्रान्स (पेनल्टी)

गोल्डन बूट स्पर्धक –


१. किलियन एमबाप्पे (फ्रान्स) – ७ गोल
२. लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) – ६ गोल

३. ऑलिव्हियर गिरौड (फ्रान्स) – ४ गोल
४. ज्युलियन अल्वारेझ (अर्जेंटिना) – ४ गोल

किलियन एमबाप्पेचे एकापाठोपाठ दोन गोल –

फ्रान्सला ८०व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली, ती स्टार खेळाडू कायलियन एमबाप्पेने घेतली. गोलरक्षक मार्टिनेझ पूर्णपणे तयार होता, पण एम्बाप्पेचा फटका तो रोखू शकला नाही. अशाप्रकारे फ्रान्सने पहिला गोल नोंदवून सामन्यात पुनरागमन केले आहे. त्याने पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल करून सामना बरोबरीत आणला.