भारताच्या चार बॉक्सिंगपटूंन आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा सुबिक बे (फिलिपाईन्स) येथे आयोजित करण्यात आली होती.
नरिंदर बेरवाल (९१ किलो), ललित प्रसाद (४९ किलो), अभिषेक बेनिवाल (८१ किलो) व अमृतप्रितसिंग (९१ किलोवरील) यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांना कांस्यपदक मिळाले. नरेंदर याला उजबेकिस्तानच्या उल्गेबेक मुबीनोव्ह याने ११-८ असे चिवट लढतीनंतर पराभूत केले. बेनिवाल याला कझाकिस्तानच्या एदित ओर्नीबासारोव्ह याने २६-२१ असे हरविले. कझाकिस्तानचा युवा राष्ट्रीय विजेता एबीयेक एर्मेतोव्ह याला अमृतप्रित याने चांगली झुंज दिली मात्र ही लढत अमृत याला १४-१५ अशी केवळ एक गुणाने गमवावी लागली. जपानच्या कोसेई तानाका याने ललित याचा १७-१० असा सहज पराभव केला.

Indian Relay Teams Qualify for Olympics
रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेदरम्यान भारताच्या महिला, पुरुष संघांना यश
South Africa squad announced for T20 World Cup 2024
T20 WC 2024 : विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर! IPL मध्ये डंका वाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
mohsin nakki
लाहोर, कराची, रावळपिंडीला पसंती; चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम
jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके