टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघाच्या खेळाडूंची पहिली तुकडी न्यूयॉर्कसाठी रवाना झाली. या ताफ्यात अनेक भारतीय खेळाडू होते, पण भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या तुकडीत नसल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताच्या टी-२० वर्ल्डकप संघातील पंड्याच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा विभक्त होणार असल्याच्या बातमया सध्या जोर धरून आहेत. हार्दिकच्या वर्ल्डकप संघासोबतच्या अनुपस्थितीमुळे या बातम्यांना अधिक दुजोरा मिळाला आहे. तर मुख्य म्हणजे नताशा किंवा हार्दिक कोणीच यावर वक्तव्य केलेल नाही. पण हार्दिक नेमका आहे कुठे हे एका रिपोर्टमध्ये समोर आले आहे.

क्रिकबझच्या एका अहवालानुसार, मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२४ मधील मोहीम संपल्यानंतर हार्दिक पंड्या भारताबाहेर गेला आहे. आयपीएलमधील तणावपूर्ण मोहिमेनंतर स्वतःला पुन्हा ‘रिजार्च’ करण्याच्या उद्देशाने, हार्दिकने एक किंवा दोन आठवडे विदेशात पण एका अज्ञात ठिकाणी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, न्यूयॉर्कमधील पहिल्या सराव सत्रासाठी तो वेळेत संघात सामील होण्याची शक्यताही आहे. १ जून ते २९ जून दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी हार्दिक पंड्या हा भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. हार्दिकने काही दिवसांपूर्वी स्विमिंग पूलमधील एक व्हीडिओ शेअर केला होता. ज्यावर त्याने Recharging असे कॅप्शन दिले होते.

हेही वाचा – IPL 2024 : केकेआरने तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर अंबाती रायुडूने विराटला डिवचलं; म्हणाला, “फक्त ऑरेंज कॅप जिंकून…”

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिक पंड्या नेमका आहे तरी कुठे?

IPL 2024 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच हार्दिक चर्चेत आला. रोहित शर्माच्या जागी हार्दिकला आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझीचा कर्णधार बनवण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय चाहत्यांना पटला नव्हता. त्यामुळे संपूर्ण हंगामात हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला, टीकेला सामोरे जावे लागले. याचसोबत कर्णधार म्हणून हार्दिकची कामगिरीही खूपच सुमार दर्जाची होती, ज्याचा संघालाही वेळोवेळी फटका बसला. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत १०व्या म्हणजेच तळाशी स्थानी राहिला, जी संघासाठी लाजिरवाणी कामगिरी ठरली.

हेही वाचा – KKR आयपीएल चॅम्पियन झाल्यानंतर आंद्रे रसेल झाला भावुक, अश्रू पुसत म्हणाला, “या फ्रँचायझीने माझ्यासाठी… “

“तो वैयक्तिक पातळीवर बऱ्याच गोष्टींमधून जात आहे, ज्या कदाचित थोड्या अनावश्यक आहेत. हार्दिकसाठी ही नक्कीच शिकण्याची संधी असेल कारण तो त्याच्या नेतृत्व कौशल्यातही विकास होत आहे. सध्या कठीण काळ जावे लागत आहे पण हा काळही निघून जाईल. त्यामुळे तो एक कणखर नेता बनेल आणि निश्चितपणे या भूमिकेतही तो विकसित होईल.” १७ मे रोजी मुंबई इंडियन्सने शेवटचा सामना खेळल्यानंतर पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर म्हणाले होते.