नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळ निश्चित करण्यावरून प्रलंबित असलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

‘बीसीसीआय’ने घटनादुरुस्तीची परवानगी मागताना पदाधिकाऱ्यांच्या स्थगित कार्यकाळाची (कूिलग ऑफ पिरेड) अट रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा संबंधित राज्य संघटनांमधील सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांना घटनेनुसार ‘बीसीसीआय’मधील पदांवर कायम राहता येणार नाही. त्यामुळेच स्थगित कार्यकाळाची अट रद्द करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची परवानगी ‘बीसीसीआय’ने मागितली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.