पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडल्यावर होंडुरास आणि इक्वेडोर यांच्यासाठी दुसरा सामना ‘करो या मरो’ असाच असेल. कारण हा सामना पराभूत झाल्यावर यापैकी एका संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येणार आहे. दोन्ही संघांना विश्वचषकातील पहिल्या विजयाची संधी असून कोणता संघ जिंकतो आणि कोणता संघ पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पहिल्या सामन्यात होंडुरासला फ्रान्सकडून आणि इक्वेडोरला स्वित्र्झलडकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडून सकारात्मक दृष्टीने या सामन्याकडे पाहावे लागेल. दोन्ही संघांचा विचार केला तर इक्वेडोरचे पारडे होंडुरासपेक्षा जड असल्याचे दिसत असून ते सामना जिंकतील, अशी भाकिते वर्तवली जात आहेत. त्यामुळे होंडुरासला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागेल.
सामना क्र. र६
‘इ’ गट : होंडुरास वि. इक्वेडोर
स्थळ : अरेना डा बइझाडा, कुरिटीबा
वेळ : (२१ जून) पहाटे ३.३० वा.