बापू नाडकर्णी यांच्या निधनानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे. सचिन म्हणतो बापू तुमच्या 21 मेडन ओव्हर्सची गोष्ट ऐकून मोठा झालो आहे. कसोटी सामन्यात तुम्ही 21 षटकं निर्धाव टाकली होती. त्या रेकॉर्डचा किस्सा ऐकून मी मोठा झालो आहे या आशयाचं ट्विट सचिन तेंडुलकरने केलं आहे. माझ्या सद्भभावना नाडकर्णी कुटुंबासोबत आहेत. बापू नाडकर्णी यांना आदरांजली. असंही सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं आज त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. बापू नाडकर्णी हरहुन्नरी खेळडू असूनही क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले ते त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से प्रसिद्ध आहेत. बापू आपल्या गोलंदाजीत एकही वेळा चूक करीत नाहीत हिच सगळ्यात मोठी चूक ते करतात असे क्रिकेटचे पंडित म्हणत. प्रथम श्रेणी आणि कसोटी सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी पाहिल्यावर अनेकांनी त्यांना सगळ्यात कमी धावा देणारे गोलंदाज म्हणून बापू नाडकर्णी यांची ख्याती होती.