राजकोटच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धचा दुसरा टी-२० सामना हा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी अत्यंत महत्वाचा आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, रोहितने तात्काळ मैदानात पाऊल ठेवताच त्याच्या नावावर शतकाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शंभरावा सामना खेळणारा रोहित पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही. महेंद्रसिंह धोनीने ९८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही स्वरुपातला शंभरावा सामना खेळणं हे कोणत्याही खेळाडूसाठी मानाचं समजलं जातं. ज्याप्रमाणे रोहित शर्मा शंभरावा टी-२० सामना खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे, त्याचपद्धतीने पहिला १०० वा वन-डे आणि कसोटी सामना खेळणाऱ्या खेळाडूंची नावं आज आपण जाणून घेऊया…

भारताकडून पहिल्यांदा शंभरावी कसोटी – सुनील गावसकर (१९८४)
भारताकडून पहिल्यांदा शंभरावी वन-डे – कपिल देव (१९८७)
भारताकडून पहिल्यांदा शंभरावी टी-२० – रोहित शर्मा ( २०१९)

दिल्ली येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशकडून भारताला पराभव सहन करावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली होती, यानंतर बदलाचे संकेत देऊनही रोहित शर्माने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघामध्ये बदल केले नाही.

अवश्य वाचा – IND vs BAN : मैदानावर पाऊल ठेवताच ‘हिटमॅन’चं शतक