धावसंख्या कमी असली की गोलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामना फिरवण्याची ताकद संघाकडे हवी असं म्हटलं जातं. भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यानच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्येही असाच एक भन्नाट प्रयत्न भारतीय खेळाडूकडून पहायला मिळाला. भारतीय संघाची डळमळती सुरुवात झाल्यानंतर अवघ्या १२५ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने पाहुण्यांना दिलं. इंग्लंडने हा सामना ८ गडी राखून जिंकला. मात्र या सामन्यामधील भारताच्या के. एल. राहुलच्या क्षेत्ररक्षणाची चांगलीच चर्चा रंगली.

विशेष म्हणजे भारतीय फलंदाज ज्या खेळपट्टीवर चाचपडताना दिसत होते त्याच खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी जम बसवला आणि फटकेबाजी सुरु केली. वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकी गोलंदाजांचाही इंग्लंडच्या फलंदाजांनी समाचार घेतला. असाच एक प्रयत्न अक्सर पटेलच्या फिरकी गोलंदाजीवर जोस बटलरने केला उत्तुंग षटकार मारण्याचा नादात बटलरने चेंडू टोलवला. चेंडू अगदी षटकार जाणार असं वाटत असतानाच सीमेरेषेजवळ के. एल. राहुलने अफलातून क्षेत्ररक्षण करत सहा ऐवजी केवळ दोन धावा दिल्या.

के. एल. राहुलने चेंडूंचा अंदाज घेत योग्य वेळी उडी मारत चेंडू हवतेच झेलला आणि स्वत: सीमारेषेपलीकडे पडण्याआधी चेंडू पुन्हा मैदानात फेकला. राहुलची ही कामगिरी पाहून समालोचकांनाही त्याचं कौतुक केलं. आजच्या काळातील खेळाडूंची चपळता ही अफाट असते अशा शब्दांमध्ये समालोचकांनी राहुलची स्तुती केली. इंटरनेटवरही राहुलवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

रोहित शर्माऐवजी सलामीला आलेल्या राहुलला फलंदाजीमध्ये मात्र फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. चार चेंडूंमध्ये एक धावा करुन तो दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच तंबुत परतला.