Sunil Gavaskar praises Sanju Samson’s century : भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव करत मालिका जिंकली आहे. पार्लच्या बोलंड पार्कवर खेळल्या गेलेल्या निर्णायक सामन्यात संजू सॅमसनने शानदार शतक झळकावले. पदार्पणाच्या ८ वर्षानंतर संजूने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. संजूने संथ खेळपट्टीवर ज्या संयमाने फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाचा माजी कर्णधार सुनील गावसकर संजूचा चाहता झाला आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी संजूच्या या शतकाचे भरभरून कौतुक केले आहे. गावसकरांनी संजूच्या या शतकाला गेम चेंजर म्हटले आहे. संजूचे हे शतक त्याचे संपूर्ण करिअर बदलून टाकेल, असे टीम इंडियाच्या माजी सलामीवीराला वाटते. संजू सॅमसनने ११४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. संजूला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. संजूने कर्णधार केएल राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली, तर तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली.

Marcus Stoinis Highest individual scores in IPL run chases with 124 Runs
IPL 2024: मार्कस स्टॉइनसची ऐतिहासिक खेळी, आयपीएलच्या इतिहासात ही कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा

सुनील गावसकर संजूच्या खेळीचे झाले चाहते –

संजू सॅमसनची ही खेळी पाहून ‘स्टार स्पोर्ट्स’च्या कार्यक्रमात बोलताना सुनील गावसकर म्हणाले, ‘संजू सॅमसनच्या या खेळीत मी जे पाहिले, ते त्याचे वेगळे शॉट सिलेक्शन होते. यापूर्वी चांगली सुरुवात करूनही तो बाद होत होता. पण आज तो खराब चेंडूंची वाट पाहत होता आणि मग फटके खेळत होता. त्याने उत्कृष्ट खेळी खेळली. हे शतक त्याच्या कारकिर्दीत गेम चेंजर ठरेल, असे मला वाटते. त्याच्या या शतकामुळे आता त्याला अधिक संधी मिळतील.’

हेही वाचा – IND vs SA : तिसऱ्या सामन्यात सॅमसन-अर्शदीपची कमाल! भारताची दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी मात, मालिका २-१ ने जिंकली

संजूने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला –

संजू सॅमसनने २०१५ मध्ये टी-२० च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. २०२१ मध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आजतागायत संजू संघात आत-बाहेर होत राहिला आहे. त्याला सातत्यपूर्ण संधी मिळत नव्हती. हा सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण सध्याच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो काही विशेष करू शकला नव्हता.

हेही वाचा – IND vs SA : तिसर्‍या वनडे सामन्यातून ऋतुराज गायकवाडला का वगळलं? बीसीसीआयने सांगितले कारण

तो स्वत:वर अधिक विश्वास ठेवू लागेल –

सुनील गावसकर पुढे म्हणाले, ‘मला वाटतं आता तो स्वत:वर अधिक विश्वास ठेवू लागेल. हे शतक त्याला पटवून देईल की तो योग्य दिशेने जात आहेत. तो काय करू शकतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्या क्षमतेवर कोणालाच शंका नाही. आज त्याने खरोखरच शानदार खेळी केली आहे.’