ACC U19 Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची बातमी ऐकून क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळाला. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एकतर्फी हा सामना जिंकला होता. आता पुन्हा, १० डिसेंबरला म्हणजे तीन दिवसांनंतर भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानात आमनेसामने येतील असे म्हटले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते पूर्णपणे खरे आहे.
पुरुष अंडर-१९ आशिया चषकाला शुक्रवार, ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये रविवारी, १० डिसेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. उदय सहारन या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईतील आयसीसी अॅकॅडमी ओव्हलवरील पहिल्या क्रमांकाच्या मैदानावर होणार आहे.
आठ संघांच्या अंडर-१९ आशिया चषकामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि जपान या संघांचा समावेश आहे. या संघांची ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. या गटात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका, यूएई आणि जपान या संघांना स्थान देण्यात आले आहे. आठ संघांच्या स्पर्धेत भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध ८ डिसेंबर रोजी होणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर पाकिस्तान संघ आपला पहिला सामना ८ डिसेंबरला नेपाळविरुद्ध खेळणार आहे.
विश्वचषकात पाकिस्तानचा वरिष्ठ संघ भारताविरुद्ध एकतर्फी पराभूत झाला होता.
उल्लेखनीय आहे की विश्वचषक २०२३ मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ संघांमध्ये सामना झाला होता. टीम इंडियाने ७ विकेट्सने आरामात विजय मिळवला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकात १९१ धावांवरच मर्यादित राहिला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने ३०.३ षटकांत ३ गडी राखून विजय मिळवला.
अंडर-१९ आशिया कपसाठी भारतीय संघ
उदय सहारन (कर्णधार), सौमी कुमार पांडे (उपकर्णधार), अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन दास, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, धनुष गौडा, अविनाश राव (यष्टीरक्षक), एम अभिषेक, इनेश महाजन (यष्टीरक्षक), आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.
एसीसी अंडर-१९ आशिया चषक २०२३ किती वाजता सुरू होईल?
स्पर्धेतील सर्व सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतील.
एसीसी अंडर-१९ आशिया चषक २०२३ कधी सुरू होईल?
एसीसी अंडर-१९ आशिया चषक२०२३, ८ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे.
भारतात एसीसी अंडर-१९ आशिया चषक २०२३चे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
एसीसी अंडर-१९ आशिया चषक २०२३चे थेट प्रेक्षेपण एसीसी युट्यूब चॅनल आणि Asian Cricket Council TV वर विनामूल्य पाहता येणार आहे. तिथे लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.