उर्वरित दोन सामन्यांत भारतीय संघात बदल नाही
न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघ कायम ठेवण्यात आला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करणार नसल्याचे पत्रक बीसीसीआयकडून जारी करण्यात आले आहे. भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असून भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. भारतीय संघाच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठीचा १४ सदस्यीय भारतीय संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एखदिवसीय मालिकेसाठी सुरेश रैनाची निवड करण्यात आली होती. मात्र, रैना आजारी असल्याने त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. तो दुसऱया सामन्यात खेळू शकेल अशी आशा सर्वांना होती. पण पुढील दोन्ही सामने तो खेळू शकला नाही. अद्याप सुरेश रैना आजरपणातून बरा झालेला नसल्याने त्याला आता संपूर्ण मालिकेला मुकावे लागणार आहे. भारतीय संघाने रविवारी मोहाली येथे झालेल्या सामन्यात किवींवर सात धावांनी दणदणीत विजय साजरा करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. यापुढील सामना बुधवारी रांची येथे होणार असून अंतिम सामना २९ ऑक्टोबरला विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.

Indian Women Badminton Team gets off to a winning start sport news
भारतीय महिला बॅडमिंटन संघाची विजयी सुरुवात
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात