राखी चव्हाण

काही दिवसांपूर्वी आसाम आणि आता उत्तराखंडमध्ये अवघे जंगल वणव्याने कवेत घेतले आहे. जमिनीवरून वणवा विझवण्याचे सर्व उपाय तोकडे पडल्यानंतर आता हवाई दल आणि भारतीय लष्कराची मदत घेतली आहे. जगभरातच वणव्याचे प्रमाण वाढले आहे. चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील वणव्याची धग कायम होती. तर आता उत्तराखंडमधील वणवा महिना होत आला तर शांत होण्यास तयार नाही. तो थांबला नाही तर मात्र आणखी गंभीर परिणाम समाेर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Mohan bhagwat,
“मणिपूरमधील वाद मिटवण्याला प्राथमिकता द्या”, मोहन भागवत यांचे विधान चर्चेत!
India worst ever heat wave in May
मेमध्ये १.५ अंश तापमानवाढ; भारतातील आतापर्यंतची सर्वात तीव्र उष्णतेची लाट
May PMI at 5 month low
सेवा क्षेत्रही मरगळीकडे! मेचा ‘पीएमआय’ ५ महिन्यांच्या नीचांकांवर
Ac blast in noida
AC Blast: कडक उन्हाळ्यात एसीमध्ये स्फोट होण्याची कारणं काय? कोणती खबरदारी घ्यावी?
heatwave in north india
उष्माघातामुळे ५४ जणांचा मृत्यू, उत्तर भारत उकाड्याने हैराण; दिल्लीत आज धुळीच्या वादळाची शक्यता
loksatta analysis severe warming in indian cities
विश्लेषण : शहरांमधील तापमानवाढ किती गंभीर? 
palghar
शहरबात: पैशाचा पाऊस
Children should be given water break in schools advises by paediatrician
शाळांमध्ये मुलांना ‘पाणी सुट्टी’ द्यावी, बालरोग तज्ज्ञांचा सल्ला

उत्तराखंडमधील वणव्याचा इतिहास काय सांगतो?

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने उत्तराखंडच्या आगीचा उपग्रह फोटो प्रसिद्ध केला आहे. या महिन्यात राज्यात आगीच्या एकूण पाच हजार ७१० घटना घडल्याचे नासाने उपग्रह अहवालावरुन सांगितले. २०२२ मध्ये एप्रिल महिन्यात एकाच दिवशी वणव्याच्या ५१ घटनांची नोंद करण्यात आली. तर संपूर्ण एप्रिल महिन्यात १५०० वणव्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. २०२३ मध्ये एप्रिल महिन्यात एक हजार ४६ नोंदी होत्या. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये पाचपट अधिक वणव्याच्या घटना घडल्या. उत्तराखंड वनविभागाने यावर्षी २५ एप्रिलपर्यंत मानवनिर्मित आगीच्या १४६ घटनांची नोंद केली आहे. तर एक नोव्हेंबर २०२३ पासून आतापर्यंत उत्तराखंडमध्ये ६०६ जंगलात आग लागली असून ७३५.८१५ हेक्टर वनजमीन नष्ट झाली.

हेही वाचा >>> विश्लेषण : फॉर्म नाही, नेतृत्व नाही तरी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठी हार्दिक उपकर्णधार कसा? त्याच्यावरील विश्वास भारतासाठी घातक ठरणार?

वणव्यामुळे उत्तराखंडच्या पर्यटनावर परिणाम?

उत्तराखंड राज्यात ऐन पर्यटनाच्या हंगामात वणवा पेटला आहे. मे महिन्यात या राज्यात चारधाम यात्रा सुरू होणार असून त्या दृष्टीने तयारी झाली आहे. मात्र, वणवा आटोक्यात येण्याऐवजी पसरत चालला आहे. या राज्यात सर्वाधिक पर्यटक उन्हाळ्यात येतात. नैनिताल हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते ठिकाण आहे. तर शनिवार आणि रविवार पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या वाहनांमुळे येथे वाहतूक खोळंबल्याचे दृश्य दरवर्षी दिसून येते. मात्र, नैनितालचे जंगल गंभीर वणव्याने कवेत घेतले आहे. अशा परिस्थितीत आग लवकर आटोक्यात आणली नाही तर पर्यटकदेखील इकडे फिरकू शकणार नाहीत.

जंगलात वणवा का आणि कधी पेटतो?

भारतीय वनसर्वेक्षण अहवालातील आकडेवारीनुसार भारतातील ३६ टक्के जंगलांमध्ये वारंवार वणवा लागण्याची शक्यता अधिक आहे. मोठ्या प्रमाणावर कोरडे तण असल्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये जंगलात आग लागण्याच्या घटना वाढतात. यातील बहुतांश आगीच्या घटना या शेती किंवा अनियोजित पद्धतीने जमिनींचा वापर केल्यामुळे घडतात. वणवा लागण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. यामध्ये उष्णता, जंगलातील वनस्पती आणि आर्द्रता या कारणांचा त्यात समावेश होऊ शकतो. वणव्यांची तीव्रता आणि त्यांची वारंवारिता ही याच गोष्टींवर अवलंबून असते.

हेही वाचा >>> एटीएमचा नवा कार्ड ट्रॅप घोटाळा; कफल्लक व्हायचं नसेल तर हे वाचाच

‘बांबी बकेट’ ही यंत्रणा कशी काम करते?

उत्तराखंडमधील आग विझवण्यासाठी ‘बांकी बकेट’चा वापर करण्यात येत आहे. २०१६ मध्ये देखील वणवा नियंत्रणासाठी ही मदत घेण्यात आली होती. याला ‘हेलिकॉप्टर बकेट’ किंवा ‘हेलीबकेट’ असेही म्हणतात. हे एक विशेष हवाई अग्निशमन साधन असून १९८० पासून वापरात आहे. हे हेलिकॉप्टरच्या खाली केबलद्वारे नियंत्रित केले जाते. आगीच्या वर उडण्यापूर्वी नदी किंवा तलावामध्ये खाली टाकून पाण्याने भरले जाते आणि बादलीच्या तळाशी झडप उघडून हवेतून सोडले जाते. हेलिकॉप्टर पायलट ही यंत्रणा नियंत्रित करतात. त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते जलद आणि सहज भरले जाऊ शकते. तसेच तलाव आणि जलतरण तलावांसह विविध स्रोतांमधून पाणी भरले जाऊ शकते, ज्यामुळे अग्निशामकांना ते त्वरित पुन्हा भरता येते आणि आग लागलेल्या क्षेत्राकडे परत येते.

भारतात वणवाप्रवण राज्ये कोणती?

ईशान्य भारतातील राज्ये, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही भारतातील सर्वात जास्त वणवाप्रवण क्षेत्रे आहेत. २००३ ते २०१७ दरम्यान भारतात सर्वाधिक पाच लाख २० हजार ८६१ वणव्याच्या घटना आढळून आल्या. वनसर्वेक्षण अहवालानुसार भारतातील ५४ टक्केपेक्षा अधिक जंगले अधूनमधून आगीच्या संपर्कात येतात. तापमानातील तीव्र वाढ, पर्जन्यमानात घट आणि जमीन वापरण्याच्या पद्धतीत बदल यामुळे बहुतेक आशियाई देशांमध्ये जंगलातील आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०१२ साली भारतातील अर्धी जंगले वणव्याच्या कवेत होती.

वन्यप्राण्यांना धोका आहे का?

जंगलातील आगीमुळे वन्यप्राणी लोकवस्तीकडे येतात. एकीकडे जंगलात लागलेल्या आगीपासून या प्राण्यांना धोका आहे तर दुसरीकडे लोकवस्तीच्या परिसरात शिकारी आणि कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या वन्यप्राण्यांवर दुहेरी धोका निर्माण होतो. २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेली आग ही सर्वात मोठी आग होती आणि कित्येक महिने हे जंगल जळत होते. यात लाखो वन्यप्राणी जळून खाक झाले. rakhi.chavhan@expressindia.com