India U19 vs Nepal U19 33rd Match Updates : भारतीय अंडर-१९ संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सचिन दासने आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२४ मध्ये नेपाळविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याचबरोबर कर्णधार उदय सहारनही मागे राहिला नाही आणि शतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. या दोन फलंदाजांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने नेपाळच्या अंडर-१९ संघाविरुद्ध ५० षटकांत ४ गडी गमावून २९७ धावा केल्या आणि नेपाळला विजयासाठी २९८ धावांचे लक्ष्य दिले.

सचिन दास – उदय सहारन यांनी झळकावली शतकं –

नेपाळविरुद्धच्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता, प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकात २९७ धावा केल्या. भारताकडून कर्णधार उदय सहारन आणि सचिन दास यांनी शतके झळकावली. सचिनने १०१ चेंडूत ११६ धावा केल्या. यामध्ये ११ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याचबरोबर उदय सहारनने १०७ चेंडूंत नऊ चौकारांसह १०० धावा केल्या.

Virat Kohli 1st Indian player to reach 500 runs for 7th time in IPL history
GT vs RCB : विराट कोहलीने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Kolkata Knight Riders vs Delhi Capitals Match Highlights in Marathi
IPL 2024, DC vs KKR : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा विजय! दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल १०६ धावांनी उडवला धुव्वा
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?

या दोघांशिवाय भारताचा एकही फलंदाज विशेष काही करू शकला नाही. आदर्श सिंग २१ धावा करून, अर्शिन कुलकर्णी १८ आणि प्रियांशू मोलिया १९ धावा करून बाद झाले. शेवटी मुशीर खानने नाबाद नऊ धावा केल्या. नेपाळकडून गुलशन झा याने तीन विकेट्स घेतल्या. आकाश चंदलाही एक विकेट मिळाली.

हेही वाचा – IND vs ENG 2nd Test : “यशस्वी भव:”, जैस्वालच्या शतकी खेळीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही झाला खूश

भारतीय संघाने सुपर सिक्समधील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला होता. भारतीय संघाने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकून विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली होती. टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये किवी संघाचा २१४ धावांच्या फरकाने पराभव केला होता. सुपर सिक्समध्ये प्रत्येक संघाला दोन सामने खेळावे लागतात. अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.