scorecardresearch

Premium

भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० सामन्यात ७ विक्रमांची नोंद, धोनी-कोहलीच्या नावावर ‘हा’ विक्रम

भारत मालिकेत १-० ने आघाडीवर

भारतीय संघ (संग्रहीत छायाचित्र)
भारतीय संघ (संग्रहीत छायाचित्र)

आयर्लंडवर २ टी-२० सामन्यांमध्ये मात केल्यानंतर भारताने आपल्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवातही मोठ्या धडाक्यात केली आहे. पहिल्याच टी-२० सामन्यामध्ये भारताने इंग्लंडवर ८ गडी राखून मात केली आहे. या विजयासह भारत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. कुलदीप यादव आणि लोकेश राहुल हे भारताच्या विजयाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरले आहेत. कुलदीपने गोलंदाजीत ५ बळी घेतले, तर लोकेश राहुलने १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद १०१ धावांची शतकी खेळीही केली. दरम्यान या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी ८ विक्रमांचीही नोंद केली.

१ – टी-२० क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारा कुलदीप यादव हा पहिला डावखुरा मनगटी फिरकीपटू ठरला आहे.

१ – टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार धावा करण्याचा विक्रमही कोहलीने आपल्या नावावर केला आहे. कोहलीने ५६ डावांमध्ये ही किमया साधली आहे.

४ – टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावा करणारा विराट कोहली चौथा फलंदाज ठरला आहे.

२ – लोकेश राहुलचं टी-२० क्रिकेटमधलं हे दुसरं शतक ठरलं. राहुलने पहिलं शतक झिम्बाब्वेविरुद्ध झळकावलं होतं.

३ – टी-२० क्रिकेटमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त बळी घेणारा कुलदीप यादव तिसरा गोलंदाज ठरला आहे. भारताचे उरलेले दोन गोलंदाज पुढीलप्रमाणे…

  • युझवेंद्र चहल ६/२५, विरुद्ध इंग्लंड, बंगळुरु (२०१७), भुवनेश्वर कुमार ५/२४, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग (२०१८)

१ – टी-२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात लागोपाठ दोन चेंडूवर यष्टीचीत करणारा कुलदीप यादव पहिला गोलंदाज ठरला आहे.

३३ – महेंद्रसिंह धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या ३३ व्या यष्टीचीत फलंदाजाची नोंद केली. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त यष्टीचीत बळी घेण्याचा मान आता धोनीच्या नावावर. धोनीने पाकिस्तानच्या कामरान अकमल (३२) चा विक्रम मोडला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India tour of england 2018 these 7 records were made and broken during 1st t20i between ind vs eng

First published on: 04-07-2018 at 02:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×