scorecardresearch

Premium

IND vs NZ 1st Test : भारताची झुंजार फलंदाजी; चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडचा सलामीवीर माघारी!

कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवला जातोय सामना

india vs new zealand test series first test at kanpur day four
भारत वि. न्यूझीलंड पहिला कसोटी सामना

कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने आपल्या दुसऱ्या डावाची घोषणा केली आहे. आज चौथ्या दिवशी वरची फळी ढेपाळल्यानंतर श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला. न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली असून टॉम लॅथम आणि विल यंग यांनी सलामी दिली. मात्र फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने यंगला (२) पायचीत पकडले. यंगनंतर नाईट वॉचमन विल सोमरविले मैदानात आला आहे. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडने १ बाद ४ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी पाहुण्या संघाला २८० धावा कराव्या लागणार आहेत.

भारताचा दुसरा डाव

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने भारताचा सलामीवीर शुबमन गिलला (१) स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तेसुद्धा अपयशी ठरले. जेमीसनने पुजाराला (२२) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर टिम साऊदीने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करत मयंकला (१७) आणि रवींद्र जडेजाला एकाच षटकाच बाद केले. ५१ धावांत ५ गडी गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आणि रवीचंद्रन अश्विन यांनी थोडा आधार दिला. या दोघांनी संघाची धावसंख्या शतकीपार केली. जेमीसनने अश्विनला बोल्ड करत ही भागीदारी मोडली. अश्विनने ३२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर चहापानापर्यंत श्रेयसने लढा दिला. त्याने ८ चौकार आणि एका षटकारासह ६५ धावांची खेळी केली. साऊदीने श्रेयसचा काटा काढला. श्रेयस बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा न्यूझीलंडसमोर उभा राहिला. त्याने अर्धशतकी खेळी करत भारताची आघाडी वाढवली. साहाने आधी श्रेयससोबत नंतर अक्षर पटेलसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. ८१ षटकात ७ बाद २३४ धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला. साहाने ४ चौकार आणि एका षटकारासह ६१ तर पटेलने २८ धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडकडून साऊदी आणि जेमीसन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

न्यूझीलंडचा पहिला डाव

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात टॉम लॅथम आणि विल यंग यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी न देता १५१ धावांची भागीदारी उभारली. यंगचे शतक हुकले. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने यंगला यष्टीपाठी झेलबाद केले. यंगने १५ चौकारांसह ८९ धावा केल्या. त्यानंतर कप्तान केन विल्यमसनसह लॅथम उभा राहिला. वैयक्तिक १८ धावांवर असताना विल्यमसनला वेगवान गोलंदाज उमेश यादवने पायचीत पकडले. लंचनंतर अक्षर पटेलने आपल्या फिरकीत तीन फलंदाजांना अडकवले. त्याने रॉस टेलर (११), हेन्री निकोल्स (२) आणि सलामीवीर लॅथमला (९५) तंबूत पाठवले. साहाच्या बदली खेळत असलेल्या श्रीकर भरतने उत्कृष्ट यष्टीरक्षण करत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने लॅथमला यष्टीचीत केले. लॅथमने १० चौकारांसह ९५ धावा केल्या. नंतर आलेला रचिन रवींद्र जडेजाचा बळी ठरला. अक्षरने टॉम ब्लंडेल आणि त्यानंतर टिम साऊदीला बाद करत आपले पाच बळी पूर्ण केले. अश्विनने विल सोमरविलेला बाद करत न्यूझीलंडचा पहिला डाव १४२.३ षटकात २९६ धावांवर संपुष्टात आणला. अश्विनने ३ बळी घेतले.

हेही वाचा – IND vs NZ : “सूर्यकुमारला द्रविडसमोर हजर करा”, वसीम जाफरची मागणी; अक्षरची ‘ती’ चूक पकडली!

भारताचा पहिला डाव

भारताचा पहिला डाव १११.१ षटकात ३४५ धावांवर आटोपला. सलामीवीर शुबमन गिलची ५२ धावांची खेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू होती. गिलने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने त्याला बोल्ड केले. गिलचा सहकारी मयंक अग्रवाल (१३) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आलेले चेतेश्वर पुजारा (२६), कर्णधार अजिंक्य रहाणे (३५) यांनी छोटेखानी खेळी करत भारतासाठी धावा जोडल्या. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी १२१ धावांची भागीदारी रचली. श्रेयसने पदार्पणाच्या सामन्यात छाप सोडली आणि नाबाद शतक झळकावले. तर जडेजाने ५० धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीने जडेजाला माघारी धाडले. जडेजाने ६ चौकारांसह ५० धावा केल्या. त्यानंतर अय्यरने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावा जोडल्या. अय्यरने जेमीसनच्या गोलंदाजीवर शतक झळकावले. पदार्पणात शतक झळकावणारा श्रेयस १६वा भारतीय ठरला. पुढच्या दोन षटकात भारताने साहाला (१) गमावले. साऊदीने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. भारताच्या तीनशे धावा फलकावर लागल्यानंतर श्रेयस माघारी परतला. साऊदीने त्याला १०५ धावांवर तंबूत धाडले. श्रेयसने १३ चौकार आणि २ षटकार ठोकले. श्रेयसनंतर अश्विनने किल्ला लढवला. अश्विनने ५ चौकारांसह ३८ धावा केल्या. पटेलने इशांत शर्माला पायचीत पकडत भारताचा डाव संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून साऊदीने ६९ धावांत ५, जेमीसनने ३ तर पटेलने २ बळी घेतले.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – अजिंक्य रहाणे (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि उमेश यादव.

न्यूझीलंड – टॉम लॅथम, विल यंग, ​​केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर) , रचिन रवींद्र, टिम साऊदी, एजाज पटेल, काइल जेमीसन, विल सोमरविले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs new zealand test series first test at kanpur day four adn

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×