रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत जबरदस्त यश मिळवले. आता भारतीय संघाच्या नजरा श्रीलंकेविरुद्ध याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यावर आहेत. भारत-श्रीलंका तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांसाठी भिडणार आहेत. आज २४ फेब्रुवारीला लखनऊमध्ये टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळेल.

विराट कोहली आणि ऋषभ पंत टी-२० मालिकेचा भाग असणार नाहीत. दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. शिवाय दीपक चहर आणि सूर्यकुमार यादव जायबंदी झाले आहेत, त्यामुळे रोहितसमोर कडवे आव्हान असेल. भारताचे अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांना कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. केएल राहुल दुखापतग्रस्त असून पंतलाही विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहला टी-२० आणि कसोटी दोन्ही संघांचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

West Indies Beat South Africa by 30 Runs in 2nd T20I Match
WI vs SA: पुन्हा जिंकता जिंकता हरली दक्षिण आफ्रिका, अखेरच्या ५ षटकांत वेस्ट इंडिजने पालटला सामना, २० धावांत ७ विकेट…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Pakistani team cricketers trolls on social media
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तुफान ट्रोल, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
WTC Points Table ENG vs SL England big stride After 1st test of ENG vs SL Win by 5 Wickets
WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची WTC गुणतालिकेत मोठी झेप, पाकिस्तानसह ‘या’ देशांना टाकलं मागे, भारत कितव्या स्थानी?
Joe Root most test fifty record
ENG vs SL : जो रूटने एकाच डावात मोडले दोन मोठे रेकॉर्ड, राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला टाकले मागे
Mohammed Shami Likely To Play Ranji Trophy Match From Bengal on 11 October
Mohammed Shami: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची तारीख ठरली! १० महिन्यांनंतर ‘या’ स्पर्धेत खेळणार पहिला सामना
Virat Kohli fights with Asitha Fernando video viral during India vs Sri Lanka 3rd ODI
IND vs SL : असिता फर्नांडोने विराट कोहलीशी घेतला पंगा, अन् सामन्यानंतर… VIDEO व्हायरल
IND vs SL 3rd ODI Match Sri Lanka defeated India by 110 runs
IND vs SL 3rd ODI : श्रीलंकेसमोर भारताचे सपशेल लोटांगण; २७ वर्षांनी टीम इंडियाने गमावली वनडे मालिका

हेही वाचा – ‘‘वृध्दिमान साहासारखाच माझ्यावरही अन्याय झाला”, भारताच्या आणखी एका दिग्गज विकेटकीपरनं केला खळबळजनक खुलासा!

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत श्रीलंकेचा संघ दासून शनाकाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर ४ मार्च ते १२ मार्च दरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जातील.

वेळापत्रक

२४ फेब्रुवारी पहिला टी-२० सामना, लखनऊ

२६ फेब्रुवारी दुसरा टी-२० सामना, धर्मशाळा

२७ फेब्रुवारी तिसरा टी-२० सामना, धर्मशाळा

४-८ मार्च पहिली कसोटी, मोहाली

१२-१६ मार्च दुसरी कसोटी, बंगळुरू