अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क मैदानावर पा हजेरी लावल्यामुळे अखेरचा सामना रद्द करण्यात आला.  दुसरा सामना अनिर्णित राहिल्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने  टी-२० मालिका  १-० अशी खिशात घातली. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या मैदानावर दुसरा टी-२० सामन्याला पावसामुळे रविवारी तब्बल ४०  मिनिटे उशिरा सुरुवात झाली होती. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केल्यानंतर भारताने  वेस्ट इंडिज संघाला १९.४ षटकात १४३ धावात गुंडाळले होते. गोलंदाजांनी सुरेख कामगिरी बजावल्यानंतर  भारताच्या डावाला सुरुवात होताच पावसाचे आगमन झाले. त्यामुळे  पहिल्या दोन षटकानंतर खेळ थांबविण्यात आला होता.  वेस्ट इंडिजने ठेवलेल्या १४४ धावांचा पाठलाग करताना दोन षटकामध्ये भारताने बिनबाद १५ धावा केल्या होत्या.  खेळ थांबविण्यात आला तेंव्हा  रोहित शर्मा (१० ) आणि अंजिक्य रहाणे (४) धावावर खेळत होते. पहिल्या टी -२० सामन्यात बलाढ्य धावसंख्या उभारणाऱ्या टी-२० चॅम्पियन संघाला भारताने १४४ धावात गारद केल्यानंतर भारताने विजयाच्या  इराद्याने मैदानात उतरल्याचे दाखवून दिले. मात्र पावसाने भारताला चॅम्पियन संघासोबत बरोबरी करण्याची संधी हिसकावून घेतली. भारताकडून दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या संधीचे सोने करत फिरकी गोलंदाज अमित मिश्राने  सर्वाधिक तीन बळी मिळविले. तर मोहम्मद शमी,जसप्रीत बुमराह आणि आर आश्विन यांनी प्रत्येकी  दोन बळी टिपले. भुवनेश्वर कुमारने एक बळी घेतला. वेस्टइंडिजकडून सलामीवीर जॉन्सन चार्लस वगळता कोणालाही मैदानावर जम धरता आला नाही.  चार्लसने २५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४५ धावा ठोकल्या. पहिल्या सामन्यात शतकी खेळी साकारणाऱ्या  ईव्हिन लेविसने संघाच्या धावसंख्येत केवळ सात धावांची भर घातली.  शनिवारी झालेल्या पहिल्या टी २० सामान्यात विजयाच्या उंबरठ्यावरुन भारताला पराभव पत्करावा लागला होता. भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी  मैदानावर असताना अवघ्या एका धावेनं भारताला पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची संधी पावासाने हिरावून घेतली.

All out! Watch how the Indian bowlers bowled West Indies out for just 143 runs inside 20 overs in the 2nd @Paytm T20 pic.twitter.com/VP2KkNy3Mo