अफगाणिस्तानविरुद्ध महिन्याच्या पूर्वार्धात झालेल्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी राखणारा संघच वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी कायम ठेवला आहे. भारत-विंडीज यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला २३ जूनपासून प्रारंभ होत आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाल्यामुळे विंडीजचा संघ वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रिएल याच्याशिवाय खेळणार आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या वेगवान गोलंदाज जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजसाठी ही मालिका महत्त्वाची असेल. कारण आयसीसी क्रमवारीतील अव्वल आठ संघांनाच २०१९मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेसाठी थेट प्रवेश मिळणार आहे.

वेस्ट इंडिजचा संघ

जेसन होल्डर (कर्णधार), देवेंद्र बिशू, जोनाथन कार्टर, रोस्टन चेस, मिग्युएल ममिन्स, शाय होप (यष्टीरक्षक), अल्झारी जोसेफ, ईव्हिन लेविस, जेसन मोहम्मद, अ‍ॅश्ले नर्स, किरान पॉवेल, रोव्हमन पॉवेल, केसरिक विल्यम्स.