दिल्ली कॅपिटल्सच्या २२ वर्षीय फ्रेझर-मॅकगर्कने अवघ्या १५ चेंडूच अर्धशतक झळकावले आहे. हैदराबादने दिलेल्या २६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या फ्रेझरने विस्फोटक फलंदाजी करत १५ षटकांत दणदणीत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील हे चौथ्या क्रमांकाचे सर्वात कमी चेंडूत केलेले अर्धशतक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्धशतकानंतरही तुफानी फटके मारत असताना फ्रेझर मॅकगर्क बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने १७ चेंडूत ७ षटकार आणि ५ चौकार लगावत ६८ धावांची वादळी खेळी केली आणि संघाला पॉवरप्लेमध्ये १०० धावांची संख्या पार करून दिली. त्याने आयपीएल २०२४ मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले, पण सोबतच तो दिल्लीसाठीही सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.

अर्धशतकानंतरही तुफानी फटके मारत असताना फ्रेझर मॅकगर्क बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने १७ चेंडूत ७ षटकार आणि ५ चौकार लगावत ६८ धावांची वादळी खेळी केली आणि संघाला पॉवरप्लेमध्ये १०० धावांची संख्या पार करून दिली. त्याने आयपीएल २०२४ मधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले, पण सोबतच तो दिल्लीसाठीही सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.

दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वात वेगवान आयपीएल अर्धशतक
१५ – जेक फ्रेझर-मॅकगर्क वि एसआरएच, २०२४*
१७ – ख्रिस मॉरिस विरुद्ध जीएल, २०१६
१८ – ऋषभ पंत वि एमआय, २०१९
१८ – पृथ्वी शॉ विरुद्ध केकेआर, २०२१
१९ – ट्रिस्टन स्टब्स वि एमआय, २०२४

सुंदरच्या षटकात चौकार-षटकारांचा पाऊस

जेक फ्रेझर-मॅकगर्कने वॉशिंग्टन सुंदरच्या एकाच षटकात ३० धावा दिल्या. दिल्लीच्या डावातील तिसऱ्या षटकात त्याने पहिले दोन चेंडू लाँग ऑफच्या दिशेने चौकार मारले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर लाँग ऑफला षटकार लगावला. चौथा चेंडूही जेक फ्रेझर-मॅकगर्कने चौकारासाठी धाडला. या २२ वर्षीय फलंदाजाने षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकला. तर शेवटच्या दोन्ही चेंडूवर त्याने दणदणीत षटकार लगावले. यासह त्याने ३० धावा ६ चेंडूतच केल्या. ४,४,६,४,६,६ अशी फटकेबाजी त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या षटकात केली.

दिल्लीच्या गोलंदाजीवर हैदराबादच्या फलंदाजांनी एका षटकात २२, २३ धावा केल्या, पण फ्रेझर मॅकगर्कने एका षटकात ३० धावा करत हेड-अभिषेक शर्मापेक्षाही वरचढ खेळी केली. ट्रॅव्हिस हेडने याच सामन्यात १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. मात्र मॅकगर्कने अवघ्या १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्लेमध्ये त्याला केवळ १३ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. यावर ४६ धावा केल्यानंतर त्याने ७व्या षटकात मयंक मार्कंडेविरुद्ध अर्धशतक पूर्ण केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 jake fraser mcgurk hits half century in just 15 balls with fifty of this year dc vs srh bdg