IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings: लखनौने कर्णधार केएल राहुल आणि क्विंटनच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईवर ८ विकेट्सने आणि १ षटकार राखून दणदणीत विजय मिळवला. केएल राहुल आणि क्विंटन डीकॉकच्या १०० अधिक भागीदारीच्या जोरावर लखनऊने विजयाचा पाया रचला. चेन्नईने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजीच्या सलामीवीरांनी १५ षटकांपर्यंत एकही विकेट न गमावता दमदार फलंदाजी केली. केएल राहुल आणि क्विंटन डीकॉकने पहिल्या विकेटसाठी १२७ धावांची विक्रमी भागीदारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्विंटन डीकॉकने बाद होण्यापूर्वी ४३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. डीकॉकला १५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मुस्तफिजूरने धोनीकडून झेलबाद केले. तर केएल राहुल १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला. पाथिरानाने टाकलेल्या चेंडूवर केएलने एक चांगला फटका खेळला पण सर्वात्कृष्ट क्षेत्ररक्षक जडेजा तिथे तैनात होता आणि त्याने हवेचत झेप घेत शानदार झेल टिपला. राहुल वादळी खेळी करत ५३ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ८२ धावा केल्या. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संघाला विजय मिळवून दिला.

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर निकोलस पुरन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी संघाला विजय मिळवून दिला. पुरनने २३ चेंडूत १ षटकार आण ३ चौकारांसह २३ धावा करत नाबाद राहिला तर स्टॉयनिस ७ चेंडूत १ चौकार लगावत ८ धावा करून नाबाद परतला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकत लखनौने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या चांगलाच पथ्यावर पडला. चेन्नईला लखनऊच्या गोलंदाजांनी एकामागून एक धक्के दिले. सलामीवीर रचिन रवींद्रला मोहसिन खानने क्लीन बोल्ड करत गोल्डन डकवर बाद केले. गायकवाड आणि रहाणेने संघाचा डाव सावरला, पण ऋतुराज १७ धावा करत यश ठाकूरच्या चेंडूवर बाद झाला.

अजिंक्य रहाणे चांगल्या लयीत होता पण तोही क्रुणाल पंड्याच्या गोलंदाजीवर २४ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. तर जडेजा एकटाच मैदानात शेवटपर्यंत पाय रोवून उभा होता. जडेजाने ४० चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. शिवम दुबे आणि समीर रिझवी स्वस्तात बाद होऊन परतले. तर अनुभवी मोईन अलीने ३ षटकारांच्या हॅटट्रिकसह ३० धावा दिल्या. तर धोनीने अखेरच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडत ९ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह २८ धावा केल्या आणि संघाची धावसंख्या १७६ वर नेली.

लखनौकडून क्रुणाल पंड्याने सर्वाधिक २ विकेट तर स्टॉयनिस, रवी बिश्नोई, यश ठाकूर आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 lsg beat csk by 8 wickets kl rahul and quinton de cock 134 runs partnership for 1st wicket bdg
Show comments