लखनऊ : घरच्या मैदानावर दमदार कामगिरीसाठी प्रयत्नशील असलेल्या लखनऊ सुपर जायंट्ससमोर आज, शुक्रवारी ‘आयपीएल’ सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने गेल्या दोन सामन्यांत विजय मिळवले आहेत, तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊला सलग दोन सामने गमवावे लागले आहेत. लखनऊच्या फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजांविरुद्ध त्यांचा कस लागणार आहे. चेन्नईकडे मथीश पथिराना, मुस्तफिझूर रहमान आणि तुषार देशपांडे यांसारखे गुणवान वेगवान गोलंदाज आहे. रवींद्र जडेजाकडून अष्टपैलू कामगिरीची अपेक्षा असेल. लखनऊ येथील संथ खेळपट्टीवर श्रीलंकन फिरकीपटू महीश थीकसानाला संधी दिली जाऊ शकते. शिवम दुबे चांगल्या लयीत असून त्याला रोखण्याचे आव्हानही लखनऊच्या गोलंदाजांसमोर असेल.

हेही वाचा >>> IPL 2024: मुंबईनं पंजाबच्या तोंडचा घास पळवला

Rohit Sharma Returns As Mumbai Indians Captain In Mid Match
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज मयांक यादव गेल्या दोन सामन्यांत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याने सराव सुरू केला असून त्याच्या वेगवान चेंडूंचा सामना चेन्नईच्या फलंदाजांना करावा लागू शकतो. फिरकीपटू रवी बिश्नोईच्या कामगिरीकडेही सर्वाचे लक्ष असेल. लखनऊच्या िक्वटन डिकॉकने गेल्या तीन सामन्यांत निराशाजनक कामगिरी केली. मात्र, त्यापूर्वी दोन सामन्यांत त्याने अर्धशतके साकारली होती. त्यामुळे त्याच्या कामगिरीत सातत्य आवश्यक आहे. अष्टपैलू कृणाल पंडयालाही फारसे योगदान देता आलेले नाही. आतापर्यंत कर्णधार राहुलने २०४ धावा केल्या आहेत, तर निकोलस पूरनने सहा सामन्यांत १९ षटकार लगावले आहेत. त्यामुळे या दोघांकडून लखनऊच्या संघाला सर्वाधिक अपेक्षा असतील.

* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अ‍ॅप