IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians: मुंबई विरूद्ध पंजाबच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने शेवटी बाजी मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबला ऑल आऊट करत ९ धावांनी निसटता विजय मिळवला. आशुतोष शर्माने अखेरच्या षटकांमध्ये मुंबईवर दबाव आणला खरा पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आशुतोष शर्माची विकेट मुंबईसाठी महत्त्वाची ठरली. १८व्या षटाकात कोएत्झीने त्याला बाद करत मुंबईला सामन्यात परत आणले. बुमराहला या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या सामन्यात त्याने ४ षटकांत २१ धावा देत ३ विकेट्स मिळवल्या. तर दुसऱ्याच षटकात २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. सामनावीराच्या पुरस्कारासह बुमराह परपल कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जसप्रीतने ७ सामन्यात सर्वाधिक १३ विकेट्स घेतले.

– quiz

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? बाळासाहेब थोरातांचं उत्तर, “आम्ही…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
IPL 2025 Auction Likely To Be Held in Riyad on November 24 or 25 as Per Reports
IPL 2025 Auction: IPL 2025 बाबत मोठी अपडेट, ‘या’ तारखेला होऊ शकतो खेळाडूंचा लिलाव, ठिकाणाचे नावही आले समोर
AUS vs PAK Match Updates Australia vs Pakistan 1st ODI
AUS vs PAK : पाकिस्तानची झुंज अपयशी, अखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत मिळवला रोमहर्षक विजय
Rishabh Pant attained a stellar milestone and surpassed his idol, MS Dhoni
Rishabh Pant : ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावत केला खास पराक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे
PCB Chairman Mohsin Naqvi on Champions Trophy 2025 Said Will Try to make the Visa Issuance Policy Brisk For Indian Fans
Champions Trophy: भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्यासाठी PCBची अनोखी योजना, भारतीय चाहत्यांसाठी आखली नवी कल्पना
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Virat Kohli run out after Matt Henry direct hit video viral IND vs NZ 3rd Test
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO

पंड्याच्या १९व्या षटकात मैदानात सेट झालेल्या हरप्रीत ब्रारनेही आपली विकेट गमावली. हरप्रीत बाद झाल्यानंतर आलेल्या रबाडाने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि पुन्हा एकदा वातावरण बदलले. पण मधवालच्या अखेरच्या षटकात मोहम्मद नबीने चांगली फिल्डींग करत चेंडू इशान किशनकडे पाठवला आणि रबाडा धावबाद झाल्याने पंजाब ऑल आऊट झाला आणि मुंबईने अखेरीस सामना जिंकला.

मुंबईने पंजाबला दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या २ चेंडूवर १० धावा करत पंजाबची चांगली सुरूवात झाली. पण पहिल्याच षटकात प्रभसिमरन सिंग गोल्डन डकवर बाद झाला. त्यानंतर बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात दोन मोठे विकेट मिळवले. चौथ्या चेंडूवर बुमराहने रूसोला क्लीन बोल्ड करत एका धावेवर माघारी धाडले तर सॅम करनला इशानकडून झेलबाद करत सामन्याला वेगळे वळण दिले. तर पुढच्याच षटकात कोएत्झीने लिव्हिंगस्टोनला झेलबाद करवत ४ टॉप फलंदाजांना पॉवरप्लेमध्ये बाद केले. त्यानंतर हरप्रीत भाटीया आणि शशांक सिंगने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला श्रेयस गोपालने झेलबाद केले. तर उपकर्णधार जितेश शर्माला ९ धावांमध्ये यष्टीचीत केले. पण त्यानंतर पुन्हा एकदा शशांक सिंग आणि आशुतोष शर्माच्या जोडीने कमाल केली.

मुंबईकडून बुमराहसोबतच कोएत्झीने ४ षटकांत ३२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर आकाश मधवाल, हार्दिक पंड्या आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

शशांक आणि आशुतोषने शानदार खेळी करत मुंबई इंडियन्सवर दबाव आणला. पण बुमराहने ही जोडी तोडत शशांक सिंगला झेलबाद केले. बाद होण्यापूर्वी शशांकने २५ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह ४१ धावा केल्या. मैदानात कायम असलेल्या आशुतोषने शानदार अर्धशतक झळकावले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. १८व्या षटकात बाद होण्यापूर्वी आशुतोषने २८ चेंडूत ७ षटकार आणि २ चौकारांची ६१ धावा केल्या. बुमराहच्या गोलंदाजीवर आशुतोषने एक दमदार षटकार लगावला, ज्याची खूप प्रशंसा केली जात आहे.

तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १९२ धावा केल्या. सलामीला आलेला इशान किशन स्वस्तात बाद झाला पण रोहितने २५ चेंडूत ३६ धावांची शानदार खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपला दमदार फॉर्म दाखवून दिला, सूर्याने ५३ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या. रोहित आणि सूर्याने ८१ धावांची चांगली भागीदारी रचली. त्यानंतर तिलक वर्मानेही १८ चेंडूत ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर टीम डेव्हिड १४ धावा करत बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये पंजाबने सामन्यात पुनरागमन करत मुंबईच्या धावांना ब्रेक लावला आणि मुंबईला २०० धावांचा टप्पा गाठू दिला नाही. पंजाबकडून हर्षल पटेलने ३ विकेट्स घेतले तर सॅम करनने २ विकेट्स आणि रबाडाला १ विकेट मिळाली आहे.