How Sreesanth’s Lie Led Sanju Samson to IPL: आयपीएल २०२४ मध्ये संजू सॅमसनच्या नेतृ्त्त्वाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १० सामन्यांपैकी ८ सामने राजस्थानने जिंकले आणि १६ गुण त्यांच्या खात्यात आहेत, तर सोबतच प्लेऑफमध्ये त्यांनी आपले स्थान जेमतेम नक्की केले आहे. पण यादरम्यानच संजू सॅमसनचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे, ज्यात त्याने आयपीएलमधील प्रवासाला कशी सुरूवात झाली, याबद्दल सांगत आहे.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि फ्रँचायझीसाठी सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू सॅमसनने खुलासा केला की माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीशांत आणि रॉयल्सचा तत्कालीन कर्णधार द्रविड यांच्यातील संभाषणामुळे त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीला एक वेगळी कलाटणी दिली. श्रीशांतने राहुल द्रविडला संजू सॅमसनबद्दल एक खोटं सांगितलं ते म्हणजे की या मुलाने (संजूने) एका षटकात ६ षटकार लगावले.

सॅमसनने २००९ मध्ये आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा एक खेळाडू म्हणून प्रवेश केला. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, केकेआरने २०१२ च्या आयपीएलपूर्वी सॅमसनला करारबद्ध केले. पण संजू सॅमसनला खेळण्याची एकही संधी मिळाली नाही आणि तो पूर्णवेळ बेंचवर होता. २०१२ मध्ये केकेआरने आपले विजेतेपद जिंकल्यानंतर सॅमसनला रिलीज केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये सॅमसन सांगत आहे की -“राजस्थानविरुद्धच्या सामन्याच्या वेळेस श्रीशांतला लॉबीमध्ये राहुल द्रविडे दिसले. तेव्हा श्रीशांतने माझ्याबद्दल राहुल द्रवि़ड यांना सांगितले की- केरळचा एक मुलगा आहे, ज्याने एका स्थानिक स्पर्धेत एका षटकात सहा षटकार मारले. आपण त्याला खरंच एक संधी दिली पाहिजे.”

श्रीशांतने संजूबद्दल सांगितलेलं हे खोटं संजूच्या आयपीएलमधील प्रवेशासाठी निर्णायक ठरलं. द्रविड यांनी श्रीशांतचं हे खोटं आधीचं पकडलं होतं, पण संजूमधील क्षमता आणि त्याच्यातील कौशल्यही त्यांनी ओळखलं. श्रीशांतच्या या बोलण्यानंतर राजस्थानने संजूला संघात घेतले आणि २०१३ मध्ये पदार्पण केल्यापासून संजू आर आऱ संघाचा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे आणि नंतर त्याला संघाचे कर्णधारपदही मिळाले. सॅमसनने त्याच्या आयपीएलमधील प्रवेशाच्या या कहानीला दुजोरा मिळाला, जेव्हा श्रीशांतने कबूल केले की तरुण यष्टीरक्षक फलंदाजाला आरआर सेटअपमध्ये आणण्यासाठी तो खोटं बोलला होता.

गेल्यावर्षी स्पोर्ट्सकिडाला दिलेल्या एका मुलाखतीत संजूबद्दल सांगताना म्हणाला होता, “मी जेव्हा राहुल द्रविडला संजूची ओळख करून दिली तेव्हा त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. मी त्यांच्याशी खोटं बोललो. मी म्हणालो- या मुलाने मला लोकल टूर्नामेंटमध्ये एका षटकात सहा षटकार लगावले होते.” यावर राहुल द्रविड म्हणाले- “श्री, बाकी काहीही बोल, पण असं का सांगतोय? (काहीही बोल, पण असं खोटं का बोलतोयस).”

पुढे सांगताना श्रीशांत म्हणाला होता, “संजू सुरूवातीच्या काही सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. पण जेव्हा राहुल द्रविड यांनी त्याला फलंदाजी करताना पाहिलं, तेव्हा त्यांना खात्री पटली. ते येऊन मला म्हणाला, श्री या संजूला इतर कुठेच निवडीसाठी जाऊ देऊ नकोस, आपण त्याला साईन करतोय, मला माहित नाही त्याला किती सामने खेळण्याची संधी मिळेल पण त्याला संघात घेण्याची आमची इच्छा आहे.”