Riyan Parag YouTube Search History Viral: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज रियान परागने आयपीएल २०२४ मध्ये अप्रतिम कामगिरी केली. यंदाच्या हंगामात रियानची बॅट चांगलीच तळपली, त्याने राजस्थानसाठी खेळताना सर्वाधिक ५७३ अधिक धावा केल्या. अनेक हंगामात सातत्याने अपयशी ठरणारा रियान या वर्षी संघाचा विश्वासार्ह फलंदाज म्हणून उदयास आला. पण आयपीएल संपल्यानंतर रियान एका वेगळ्याच वादात अडकला आहे. रियान परागचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची यूट्यूब सर्च हिस्ट्री यामध्ये दिसत आहे.

रियान परागची यूट्यूब सर्च हिस्ट्री सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परागचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एखादं गाणं सर्च करायला जातो, तेव्हा YouTube ची सर्च हिस्ट्री दिसू लागते. यामध्ये अनन्या पांडे आणि सारा अली खानच्या हॉट व्हिडिओचे कीवर्ड सर्च केलेले दिसत आहेत. ही माहिती ऑनलाइन लीक झाल्यानंतर रियान पराग चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा – लुट पुट गया…आंद्रे रसेल आणि अनन्या पांडेचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल,कोच चंद्रकांत पंडितही थिरकले

२२ वर्षीय राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू रियान पराग देखील यूट्यूबवर स्ट्रीमिंग करतो. रियान परागने काल त्याच्या गेमिंग सत्रादरम्यान यूट्यूबवर लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू केलं. यावेळी तो यूट्यूबवर कॉपी राईट फ्री म्युझिक सर्च करत होता आणि तेव्हा त्याची सर्च हिस्ट्री दिसू लागली. रियान गाणे सर्च करताना त्याची स्क्रिन सुरू होतीच. परागने आधी सर्च केलेले काही कीवर्ड दिसू लागले. यामध्ये सारा अली खान हॉट, अनन्या पांडे सारखे कीवर्ड होते. परागशी संबंधित हा स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा – हार्दिक-नताशाच्या घटस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, भाऊ कृणालच्या पोस्टवरील पंड्याच्या बायकोची कमेंट व्हायरल

एका एक्स युजरने रियानचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘रियान परागची सर्च हिस्ट्री “सारा अली खान हॉट” “विराट कोहली” “अनन्या पांडे हॉट.”

रियान परागचा या आधीही काही वादांमध्ये अडकला होता. एकदा आयपीएलदरम्यान त्याची मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंसोबत भांडण झाले होते. याशिवाय रियान त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही वादात सापडला आहे. त्याच्या पोस्टमध्ये अहंकार दिसून येतो आणि त्यामुळे त्याला खूप ट्रोल केले जाते.

आयपीएल २०२४मधील यशस्वी कामगिरीनंतर रियान पराग टीम इंडियात स्थान मिळवण्याचा दावेदार म्हणून समोर आला आहे. गेल्या वर्षभरातील त्याची कामगिरीही अप्रतिम आहे. त्याने आयपीएल २०२४ च्या १६ सामन्यांमध्ये ५७३ धावा केल्या आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसरे स्थान मिळवले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या शेवटच्या सत्रात त्याने १० सामन्यात ५१० धावा केल्या होत्या. यामध्ये सलग 7 अर्धशतकांचा समावेश आहे. देवधर ट्रॉफीच्या ५ डावात त्याने ३५४ धावा केल्या आणि ११ विकेटही घेतले.