विराट कोहली यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक करणारा खेळाडू आहे. पण त्याच्या स्ट्राईक रेटवरून चर्चांना उधाण आलं आहे. विराटला त्याच्या स्ट्राईक रेटवरील चर्चांवर प्रश्न विचारला असता विराटने समालोचकांनात सुनावत सांगितलं, मी बाहेर कोण काय बोलतं, याकडे लक्ष देत नाही. तर सुनील गावसकर विराटच्या या मुलाखतीचा व्हीडिओसारखा दाखवल्याने भडकले आणि म्हणाले, तुला फरक पडत नाही तर त्यावर प्रत्युत्तर का देतोस. यामुळे सध्या विराट कोहली विरूद्ध सुनील गावसकर असं चित्र झालं आहे. यात आता वसीम अक्रमच्या वक्तव्याने लक्ष वेधलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहली आणि गावस्कर यांच्या मुद्द्यावरही अक्रमने आपलं मत मांडलं आहे. स्पोर्ट्सक्रिडाशी बोलताना अक्रम म्हणाला, “दोघेही दिग्गज खेळाडू आहेत. सुनील गावस्कर हे क्रिकेटपटू म्हणून, माणूस म्हणून खूप चांगले आहेत. सुनील गावसकर फार काळापासून समालोचक म्हणून काम करत आहेत. विराट कोहली हा इतिहासातील एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, यात शंका नाही. ज्याप्रकारची कामगिरी त्याने केली आहे, यात काही शंकाच नाही. परंतु मला वाटतं की विराटने असं म्हणायला नको होतं.

हेही वाचा- “यशानंतरही रोहित माणूस म्हणून…” युवराज सिंगचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य, रोहितच्या इंग्रजीबद्दल पाहा काय म्हणाला

पुढे बोलताना वसीम अक्रम म्हणाला, समालोचकाचे काम बोलणे आहे. जर तुमचा स्ट्राइक रेट एक-दोन सामन्यात कमी झाला असेल आणि त्यांनी तुम्हाला तसे सांगितले असेल, तर ठीक आहे जाऊदे त्याकडे दुर्लक्ष करं. विराट काही तसा मनावर घेणारा खेळाडू नाही. दोघेही खेळाडू भारतीयांचा अभिमान आहेत, दोघेही दिग्गज खेळाडू आहेत. ते दोघेही हा मुद्दा मागे सोडून पुढे जातील. मी त्या दोघांनाही ओळखतो.

विराट कोहलीच्या गेल्या टी-२० विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामन्यातील गावसकरांचा व्हीडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने एकट्याने भारताला मोठा विजय मिळवून दिला होता. तेव्हा विराटच्या प्रत्येक फटकेबाजीवर गावसकर लहान मुलाप्रमाणे नाचताना दिसत होते. विराटच्या विजयी शॉटनंतर गावसकरही नाचत होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 wasim akram statement on virat kohli sunil gavaskar spat over strike rate said virat shouldnt have said this bdg