अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने दिल्ली डेअर डेअरडेविल्स संघाचा 4 धावांनी पराभव केला. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या १४३ धावांचे माफक लक्ष्य पार करताना तारांबळ उडाली. श्रेयस अय्यरने अखेरच्या चेंडूपर्यंत खिंड लढवत दिल्लीच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या, परंतु त्यालाही अपयश आले.

पंजाबने निराशाजनक सुरुवातीनंतर निर्धारित २० षटकांत ८ बाद १४३ धावा गाठल्या. नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या दिल्ली डेअरडेविल्स संघाने पंजाबच्या फलंदाजीवर पूर्णपणे वेसण घातली. ल्युआम प्लंकेट, आवेश खान आणि ट्रेंट बोल्ट यांच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबचे फलंदाज फार मोठी मजल मारु शकले नाहीत. ख्रिस गेलला विश्रांती देण्याचा निर्णय आज पंबाजच्या चांगलाच अंगलट आला. अ‍ॅरोन फिंच अपयशी ठरल्यानंतर लोकेश राहुल, मयांक अगरवाल, करुण नायर आणि डेव्हिड मिलर यांनी छोटेखानी, परंतु महत्त्वाच्या धावा केल्या. दिल्लीकडून करुण नायरने ३४ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करुन देण्याचा प्रयत्न केला.

प्रत्युत्तरात दिल्ली हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटत होते. आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉने १० चेंडूंत ४ चौकार लगावत २२ धावा केल्या, परंतु तो बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज झटपट माघारी परतले. श्रेयस अय्यरने ४५ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावा केल्या. दिल्लीला ८ बाद १३९ धावांपर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक – किंग्ज इलेव्हन पंजाब : ८ बाद १४३ (करुण नायर ३४, डेव्हिड मिलर २६, लोकेश राहुल २३; लियम प्लंकेट ३/१७) वि. वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : ८ बाद १३९ (श्रेयस अय्यर ५७, राहुल तेवातिया २४; अंकित रजपूत २/२३).

  • भोपळाही न फोडता प्लंकेट तंबूत, दिल्लीचे 7  गडी बाद
  • राहुल तेवातिया बाद 24 धावा काढून बाद, दिल्लीचा सहावा गडी माघारी
  • दिल्लीचा निम्मा संघ माघारी, डॅनियल ख्रिश्चन 6 धावांवर धावबाद
  • मुजीब रेहमानने उडवला ऋषभ पंतचा त्रिफळा, दिल्लीचा चौथा गडी माघारी
  • ठराविक अंतराने कर्णधार गौतम गंभीर माघारी, दिल्लीला तिसरा धक्का
  • ग्लेन मॅक्सवेल माघारी, अंकित राजपूतने घेतला बळी
  • मुंबईकर पृथ्वी शॉ माघारी, अंकित रजपूतने उडवला पृथ्वी शॉचा त्रिफळा
  • दिल्ली डेअरडेविल्सची आक्रमक सुरुवात, पृथ्वी शॉ-गौतम गंभीरची फटकेबाजी
  • दिल्लीला विजयासाठी १४४ धावांचं आव्हान
  • अखेरच्या चेंडूवर अँड्रू टाय माघारी, पंजाबचा आठवा गडी माघारी
  • रविचंद्रन आश्विन माघारी, पंजाबला सातवा धक्का
  • ठराविक अंतराने डेव्हिड मिलर माघारी, पंजाबचा सहावा गडी माघारी
  • पंजाबचा निम्मा संघ माघारी, दिल्लीच्या गोलंदाजांची सामन्यावर मजबूत पकड
  • पंजाबची घसरगुंडी सुरुच, करुण नायर माघारी
  • पंजाबला चौथा धक्का, युवराज सिंह आवेश खानच्या गोलंदाजीवर माघारी
  • प्लंकेटच्या गोलंदाजीवर अग्रवाल त्रिफळाचीत, पंजाबला तिसरा धक्का
  • ठराविक अंतराने फटकेबाजी करणारा मयांक अग्रवालही माघारी
  • प्लंकेटच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल माघारी, पंबाजला दुसरा धक्का
  • मयांक्र अग्रवालची पहिल्या षटकांमध्ये फटकेबाजी
  • मयांक अग्रवालच्या मदतीने डाव सावरण्याचा लोकेश राहुलचा प्रयत्न
  • पंजाबला पहिला धक्का, अॅरोन फिंच लोकेश राहुलच्या गोलंदाजीवर झेलबाद
  • लोकेश राहुल-अॅरोन फिंचकडून डावाची सावध सुरुवात
  • किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून ख्रिस गेलला विश्रांती, ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचला संघात जागा
  • दिल्लीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय