Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year : आयपीएल २०२४ चा हंगाम सुरू झाला असून सर्व संघांनी त्यांचे जवळपास निम्मे सामने खेळले आहेत. पुढच्या हंगामासाठी महालिलाव होणार आहे, पण त्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने मोठा दावा केला आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुढील वर्षापासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसू शकतो, असा विश्वास वॉनला आहे. ऋतुराज गायकवाड कदाचित सीएसकेचे कर्णधार फक्त एका मोसमासाठी करेल असेही त्याने सांगितले.

मायकल वॉन काय म्हणाला?

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी रोहित शर्माला मुंबई इंडियन्सकडून रिलिज केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. रोहितसाठी सीएसके हा संभाव्य संघ असू शकतो, असे वॉनला वाटते. बीयरबायसेप्स पॉडकास्टवर पॉडकास्टवर बोलताना मायकल वॉन म्हणाला, “मी रोहित शर्माला पुढील हंगामात सीएसके संघासोबत पाहतोय. यावर्षी ऋतुराज गायकवाड सीएसकेचे कर्णधारपद भूषवत आहे, मात्र पुढील वर्षी तो सीएसके संघाचे कर्णधारपद स्वीकारू शकतो.”

सीएसकेने देखील आयपीएल २०२४ सुरु होण्यापूर्वी एमएस धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, शो होस्टला असे वाटले की रोहितने सीएसकेमध्ये सामील होणे एमआय चाहत्यांचे मन दुखावणारे असेल. पॉडकास्ट होस्ट म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे, तर हे हृदयद्रावक असेल. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे हे मन दुखावणारे असे. रोहितने हैदराबादकडे जाण्यात मला काही अडचण नाही, तो डेक्कन चार्जर्सकडून याआधी खेळला आहे. त्यामुळे हे रोमांचक असेल.”

हेही वाचा – T20 World Cup 2024 साठी मोहम्मद कैफने निवडला संघ, अश्विन ऐवजी ‘या’ खेळाडूला दिले स्थान, पाहा संपूर्ण संघ

एमआयमधील कर्णधारपदाच्या गदारोळावर बोलताना वॉनने हार्दिकचे समर्थन केले. यासोबतच तो म्हणाला रोहित संघाचा कर्णधार असायला हवा होता. तो म्हणाला, “हार्दिक कठीण टप्प्यातून जात आहे आणि यात त्याची चूक नाही. त्याला मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करायला सांगण्यात आले. अशा वेळी कोण नकार देईल? हार्दिकला हे काम देण्यात आल आहे, जे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूची करायची इच्छा असते. मुंबई इंडियन्ससाठी गेली काही वर्षे कठीण गेली आहेत, मला असे वाटते की हा दृष्टिकोन योग्य नव्हता.”

हार्दिकवर मुंबई इंडियन्समध्ये परत आल्याचा दबाव –

मायकल वॉन पुढे म्हणाला, “मी वैयक्तिकरित्या रोहितला कर्णधार बनवले असते. कारण हार्दिकवर मुंबई इंडियन्समध्ये परत आल्याचा दबाव आहे. रोहित साहजिकच भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे हार्दिकला लक्षात ठेवून पुढील वर्ष किंवा २ वर्षासाठी रोहितला एमआयचा कर्णधार ठेवणे. हे शहाणपणाचे पाऊल ठरले असते.”