Rishabh becomes first player to play 100th match for Delhi : आयपीएल २०२४ चा नववा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यासह ऋषभ पंत आयपीएलमध्ये १०० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सकडून १०० सामने खेळणारा तो पहिला खेळाडू आहे. याआधी या फ्रँचायझीसाठी कोणताही खेळाडू आयपीएलमध्ये १०० सामने खेळू शकलेला नाही. यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ऋषभ पंत १०० क्रमांकाची जर्सी भेट देण्यात आली.

या सामन्यासह, ऋषभ पंत केवळ दिल्ली कॅपिटल्ससाठी १०० सामने खेळणारा खेळाडू बनला नाही, तर त्याने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या क्लबमध्येही स्थान मिळवले. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्सकडून १०० वा सामना खेळणारा पंत हा पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर हे अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी १०० सामने खेळणारे पहिले खेळाडू आहेत. पंत कोणत्याही फ्रँचायझीसाठी १०० वा सामना खेळणाऱ्या पहिल्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने दिल्लीसाठीआतापर्यंत ९९ सामने खेळले आहेत. यामध्ये स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने ९८ डावात एक शतक आणि १५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने १४७.९० च्या स्ट्राइक रेटने २८५६ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोत्तम धावसंख्या १२८* धावा आहे.

हेही वाचा – IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

कोणत्याही संघासाठी १०० आयपीएल सामने खेळणारे पहिले खेळाडू –

चेन्नई सुपर किंग्स – सुरेश रैना
मुंबई इंडियन्स – हरभजन सिंग
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली
कोलकाता नाईट रायडर्स – गौतम गंभीर
राजस्थान रॉयल्स – अजिंक्य रहाणे<br>सनरायझर्स हैदराबाद – भुवनेश्वर कुमार
दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत
पंजाब किंग्सकडून आतापर्यंत कोणीही १०० सामने खेळलेले नाहीत.