आंतरराष्ट्रीय आणि प्रो-कबड्डीत महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या काशिलिंग अडकेला अटक करण्यात आलेली आहे. वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे घरात तीनपत्त्यांचा जुगार आणि दारुअड्डा चालवल्याप्रकरणी काशिलिंग अडकेसह आठ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. या कारवाईत पोलिसांनी एक लाख ६१ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

कासेगाव येथील काशिलिंग अडकेच्या घरात जुगार आणि दारुचा अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी रात्री पोलिस पथकाने काशिलिंगच्या घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान काही लोकं पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्या सर्वांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत पोलिसांनी काशिलिंग अडके, पांडुरंग पाटसुते, आरिफ मुल्ला, अतुल परीट, रसिक नायकवडी, हर्षल पाटील, जोतिराम पाटील यांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटारसायकल, विदेशी दारु असा १ लाख ६१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान करोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन असतानाही असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Crimes against 23 former directors of APMC including Shashikant Shinde
शशिकांत शिंदेंसह एपीएमसीच्या २३ माजी संचालकांवर गुन्हे
Chandrashekhar bawankule, bawankule claims that NCP sharad Pawar Group s all Candidates Will Be Defeated, lok sabha 2024, sharad Pawar Group, sharad Pawar Group going to Be Zero, bjp, satara lok sabha seat, election campaign, marathi news, satara news, sharad pawar, bjp state president Chandrashekhar bawankule,
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर

काशिलिंग अडकेले प्रो-कबड्डीत आपल्या खेळाने फार कमी वेळात आपलं नाव कमावलं होतं. दुसऱ्या सत्रात दिल्लीच्या संघाकडून खेळताना काशिलिंगला सर्वोत्तम चढाईपटूचा मानही मिळाला होता. मात्र गेल्या हंगामात कोणत्याही संघाने काशिलिंगला खरेदी केलं नाही. त्यातच तो व्यसनाच्याही आहारी केला होता. यामध्येच त्याला दारु आणि जुगाराचं व्यसन लागलं. काशिलिंग पेट्रोलियम कंपनीत कामाला होता, मात्र ही नोकरीही त्याला सोडावी लागली. यानंतर तो स्वतःच्याच घरात जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.