आठव्या डावात कार्लसनवर सनसनाटी विजय

ससा आणि कासव यांच्यातील शर्यतीत कासवच विजयी होत असतो, याची प्रचीती विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील आठव्या डावात आली. आव्हानवीर सर्जी कर्जाकिनने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना हळूहळू डावावरील पकड वाढवत कार्लसनवर विजय नोंदवला. या विजयासह त्याने या प्रतिष्ठेच्या लढतीत ४.५-३.५ अशी आघाडी घेतली आहे.

hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा

या स्पर्धेतील पहिल्या सातही डावांमध्ये बरोबरी झाल्यावर कार्लसन हा विजय मिळवण्यासाठी कमालीचा उत्सुक होता. त्या प्रयत्नात त्याने जास्त धोका पत्करून कर्जाकिनला पराभूत करण्यासाठी डावपेच खेळले, मात्र हेच डावपेच त्याच्या अंगलट आले. १२ डावांच्या या लढतीत कार्लसनला उर्वरित चार डावांमध्ये सर्वोच्च कामगिरी करावी लागणार आहे.

कार्लसनला आठव्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याचा लाभ मिळणार होता. त्याने वजिरापुढील प्यादे पुढे घेत सुरुवात केली. सहाव्या चालीस त्याने कॅसलिंग केले. पाठोपाठ कर्जाकिननेही कॅसलिंग करीत राजा सुरक्षित केला. दोन्ही खेळाडूंनी मध्य स्थानावरच आक्रमण केंद्रित केले होते. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला उंट व घोडय़ाच्या साहाय्याने चाली केल्या. २३व्या चालीला त्यांनी एकमेकांचे हत्तीही घेतले. दोन्ही खेळाडूंनी ३५व्या चालीला एकमेकांच्या हत्तींचा बळी दिला. ३७व्या चालीला कर्जाकिनने वजिरावजिरीसाठी प्रयत्न केले. परंतु कार्लसनने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्या वेळी कर्जाकिनकडे वजीर, दोन घोडे व सहा प्यादी, तर कार्लसनकडे वजीर, एक उंट व एक घोडा तसेच चार प्यादी अशी स्थिती होती. कर्जाकिनकडे दोन प्यादी जास्त असल्यामुळेच कार्लसन हा वजिरावजिरीसाठी उत्सुक नव्हता.

कार्लसनने हा डाव जिंकण्यासाठी सतत कर्जाकिनच्या राजावर आक्रमण केले. त्यामध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचा एक घोडा घेतला. त्यानंतर कार्लसनने वजिराच्या साहाय्याने कर्जाकिनच्या राजाला शह देण्याचा सपाटाच लावला. प्रत्येक वेळी वजिरानेच बचाव करीत कर्जाकिनने त्याला योग्य उत्तर दिले. या वेळीदेखील कार्लसन वजिरावजिरी करू शकत होता. सतत शह देण्याच्या प्रयत्नात त्याचा पांढऱ्या घरातील उंट निष्क्रियच राहिला. कर्जाकिनने एका बाजूने प्यादे पुढे नेले. हे प्यादे त्याने ५२व्या चालीला शेवटून दुसऱ्या घरात नेले. हे प्यादे खायचे तर शहमात होणार आहे, हे कळून चुकल्यानंतर कार्लसनने पराभव मान्य करीत कर्जाकिनशी हस्तांदोलन केले. काळे मोहरे असले तरी कल्पक चाली करीत विजय मिळू शकतो, हे कर्जाकिनने या डावात दाखवून दिले.