फिफा विश्वचषक २०२२ संपून जवळपास तीन महिने झाले आहेत जिथे जगाने अनेक शानदार,उत्कृष्ट गोल पाहिले आणि गोलरक्षकांनीही अनेक उत्तम गोल वाचवले. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, जो फुटबॉलच्या दिग्गजांनीही, विश्वचषकातील रथी-महारथी यांनी पाहिला तर ते सुद्धा थक्क होतील. या व्हिडिओमध्ये सहाव्या वर्गातील एक विद्यार्थी आहे जो असे गोल करतो ते रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीने कधीच केला नसते.

हा व्हिडिओ केरळमधील शाळेतील सामन्याचा आहे. मलप्पुरममधील अल अन्वर यूपी शाळेतील इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्याने फुटबॉल सामन्यात हा गोल केला. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याने पंडिक्कड येथील चेम्ब्रेसरी येथे १२ वर्षांखालील स्पर्धेत गोल केला. अंशिद असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या सामन्यात, त्याला डाव्या विंगकडून एक क्रॉस प्राप्त होतो, जो तो बचावपटूच्या समोर थोडासा उडी घेतो आणि नंतर त्याच्या बॅक-टाल शॉटने चेंडू नेटमध्ये टाकतो.

Gujarat student gets 212 out of 200 in primary exam
गुजरातमधील प्राथमिक शाळेच्या निकालात मास्तरांचा प्रताप; विद्यार्थ्याला २०० पैकी २१२ गुण; उत्तरपत्रिका पाहून व्हाल लोटपोट
Tamil Nadu teacher's unique video to capture happy student faces is viral
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शिक्षिकेने केले असे काही…..Viral Video पाहून पोट धरून हसाल!
A student tried to cheat by bribing teacher shocking video goes viral
बापरे! पास होण्यासाठी विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लपून ठेवले २०० रुपये, शिक्षकांना दिसताच…; VIDEO व्हायरल
Funny Answer Sheets Viral
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांने सांगितला नवा उपाय; व्हायरल उत्तरपत्रिका वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

त्याचे प्रशिक्षक इमदाद कोट्टापरंबन यांनी गोलरक्षकाकडून ओरडत असलेल्या या गोलचा व्हिडिओ शूट केला. प्रशिक्षकाने तो सोशल मीडियावर टाकला, त्यानंतर या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर काही सेकंदातच व्हायरल झाला. अनेक मंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडिओही पोस्ट केले आहेत. एकट्या इंस्टाग्रामवर ही क्लिप अडीच लाख वेळा पाहिली गेली आहे. उगवत्या सॉकर स्टारच्या कौतुकाने पोस्ट भरून गेली. आयएसएलच्या वेब पेजवर त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अन्शीद म्हणाला की, “त्याला भविष्यात आणखी चांगला खेळाडू बनायचे आहे.”

फुटबॉल खेळाडू आणि अनेक नेत्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे

यानंतर हा व्हिडिओ ‘इंडियन सुपर लीग’च्या अधिकृत वेबपेजवरही अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी लागला आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या गोलची घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. नेते व्ही.शिवनकुट्टे आणि अहमद देवरकोव यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

हेही वाचा: Umran Malik: फलंदाजांच्या दांड्या गुल करणार्‍या वेगाच्या बादशहाला वर्ल्डकप संघासाठी पूर्व प्रशिक्षकाची पसंती पण बुमराह…

इंस्टाग्रामवर आतापर्यंत २.५ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ फुटबॉल खेळाडूंना सर्वाधिक लाईक केला जात आहे. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, ‘इंडियन सुपर लीग’ने अंशिदचे अभिनंदन केले आहे आणि भविष्यात अधिक हुशार आणि चांगला खेळाडू म्हणून समोर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.