फिफाने निवडलेल्या वर्षांतील सर्वोत्तम ३ गोल्समध्ये सुब्री आघाडीवर

जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) निवडलेल्या वर्षांतील सर्वोत्तम तीन गोल्समध्ये मलेशियाचा फुटबॉलपटू मोहम्मद फैझ सुब्रीने जगातील दोन दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी व नेयमार यांना मागे टाकत सरशी साधली आहे. या गोल्समध्ये नेयमार व मेस्सी यांना स्थान मिळालेले नाही.

Ekta Day Ranveer Singh wins gold medal in steeplechase sport news
एकता डे , रणवीर सिंहला स्टीपलचेसमध्ये सुवर्ण
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
President Muizzu party secures big win in Maldive
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष विजयाच्या समीप; चीनधार्जिण्या मोइझ्झू यांच्या पक्षाला ‘मजलिस’मध्ये सर्वाधिक जागा
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात

मलेशिया सुपर लीगमध्ये पेनाग राज्याकडून खेळणाऱ्या मध्यरक्षक सुब्रीने फ्री किकवर अप्रतिम गोल केला. त्याचा या गोलने ब्राझीलचे दिग्गज रोबेर्तो कार्लोस यांनी १९९७ साली फ्रान्सविरुद्ध केलेल्या गोलची आठवण करून दिली.

सुब्रीने ३५ मीटरवरून केलेला हा गोल समाजमाध्यमांवरही अधिक चर्चिला गेला आहे. ‘हा क्षण मी विसरणार नाही आणि यातून मला कामगिरीत सुधारणा करण्यासाठी प्रेरणा मिळेल. फुटबॉल लोकांना एकत्र आणतो आणि येथे असंख्य फुटबॉल चाहते आहेत. चीन, भारत आणि मलेशियातील चाहते माझ्या गोलसाठी मतदान करतील,’ असा विश्वास सुब्रीने व्यक्त केला.

सप्टेंबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत हजारो गोलमधील तीन गोलची निवड करण्यात आली आहे. या तीन गोलमध्ये सुब्रीसह ब्राझीलच्या मार्लोन आणि व्हेनेझुएलाची महिला फुटबॉलपटू स्टेफनी रोचे यांची निवड करण्यात आली आहे. यांतील विजेत्याची घोषणा ९ जानेवारीला ज्युरिच येथे करण्यात येईल. त्यामुळे ९ जानेवारीलाच पार्टी देणार असल्याचे सुब्रीने स्पष्ट केले.