Fans Saying MS Dhoni Selfish: आयपीएल २०२४ च्या ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्जकडून ७ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई संघ आपल्या घरच्या मैदानावरच १६२ धावांचे लक्ष पार करत न आल्याने पराभव स्वीकारावा लागला. यात सीएसकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने ११ चेंडून फक्त १४ धावा केल्या. ज्यात त्याने १ षटकार आणि एक चौकार मारला. पण या सामन्यादरम्यान धोनीने अशी एक कृती केली जी चाहत्यांना अजिबात आवडलेली नाही, अनेकांनी त्या कृतीवरुन धोनीला स्वार्थी असे म्हटले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शेवटच्या षटकात घडली ‘ही’ घटना

महेंद्रसिंग धोनी आणि न्यूझीलंडचा महान फलंदाज डॅरेल मिचेल चेन्नई सुपर किंग्जसाठी शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करताना ही घटना घडली. यावेळी अर्शदीप सिंह पंजाबसाठीओव्हर टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माहीने चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव करता आली नाही. माहीने षटकातील तिसरा चेंडूही जोरात मारला. यावेळी डॅरेल मिचेल धाव घेण्यासाठी दुसऱ्या टोकाला पोहोचला; पण माहीने त्याला माघारी माघारी परतवले. पण, डॅरेल मिचेलने तरीही दोन धावा केल्या. धोनीने धाव घेण्यास नकार दिला नसता, तर चेन्नईच्या खात्यात आणखी दोन धावा जमा झाल्या असत्या. त्यामुळे धोनीच्या या कृतीवर चाहनी संताप व्यक्त केला आहेत. यावेळी शेवटच्या चेंडूत धोनीने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला; पण तो धावबाद झाला. अशा प्रकारे यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये धोनी पहिल्यांदाच बाद झाला.

treatment of hernia
पुणे: हर्नियावर फंडोप्लिकेशनद्वारे उपचार यशस्वी! जाणून घ्या या प्रक्रियेविषयी…
Shashi Tharoor Exit polls Congress Opposition performance loksabha elextion 2024
एक्झिट पोल्स फारच हास्यास्पद! आमच्या कामगिरीत किमान सुधारणा तरी होईलच : शशी थरूर
INDIA bloc leaders meeting Mallikarjun kharge forcasts 295 for INDIA
एक्झिट पोल्सवर विश्वास नाही; आम्ही २९५ च्या पार जाऊ – इंडिया आघाडीचा दावा
pune accident
पोर्श अपघातानंतर क्लब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पब्समधील सद्यस्थिती
people are travelling in a dangerous way by train
VIDEO : लोक स्वत:च्याच जीवाशी का खेळतात? ट्रेनमधून धोकादायक पद्धतीने प्रवास करणाऱ्या लोकांचा Video Viral
foreigners phone snatched by mumbai local train passenger while he films video at churchgate station but there is a twist watch video
चर्चगेट स्टेशनवर लोकलसमोर परदेशी व्यक्तीने केले ‘असे’ कृत्य, VIDEO पाहून लोकांचा संताप, म्हणाले, “मुंबईची विनाकारण बदनामी…”
Drivers Life Saved Because Of Helmet video
हेल्मेटनं मृत्यू रोखला; भर रस्त्यातला अपघाताचा VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका!
Parbhani collage going boy earn 60 thousand in month by selling pizza
परभणीचा पठ्ठ्या वयाच्या १७व्या वर्षी महिन्याला कमावतोय ६० हजार; असं करतो तरी काय? VIDEO पाहून व्हाल अवाक्

VIDEO : शाहरुखने गळा पकडताच भडकला लेक अबराम; डोळे वटारले आणि मग…? किंग खानची प्रतिक्रिया होतेय व्हायरल

धोनीने त्या क्षणी डॅरेल मिचेलबरोबर एकही धाव न घेतल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांनी आता संताप व्यक्त केला आहे. काहींनी धोनीला ‘स्वार्थी’ म्हटले आहे; तर काहींनी धोनीचा बचाव केला आहे. एका युजरने लिहिले की, रन्स न घेणे ही मोठी चूक होती, हे मान्य करतो; पण यामुळे तो स्वार्थी कसा होईल? तो कोणत्याही माइलस्टोनपेक्षा कमी नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, स्वार्थी नाही; पण त्याच्या निर्णयाने मी खुश नाही. प्रत्येक रन किमती असतो.