पुण्याच्या बालेवाडी येथील छत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. अंतिम फेरीत हर्षवर्धनने आपल्याच तालमीतल्या शैलेश शेळकेवर ३-२ ने मात करत मानाची गदा पटकावली. शैलेश आणि हर्षवर्धन हे दोन्ही मल्ल काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते…मात्र स्पर्धा संपल्यानंतर विजेत्यांना मिळणाऱ्या पुरस्काराबद्दलचा घोळ अजुनही सुरुच आहे.

अवश्य वाचा – महाराष्ट्र केसरी : हर्षवर्धनला लहानपणापासूनच्या कष्टाचं फळ मिळालं !

Crimes against 23 former directors of APMC including Shashikant Shinde
शशिकांत शिंदेंसह एपीएमसीच्या २३ माजी संचालकांवर गुन्हे
State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
MPSC Announces General Merit List, Police Sub Inspector Cadre , Relief to Candidates, mpsc announced merit list, mpsc, maharashtra news, government exam, police, police officer, marathi news, students, MPSC
एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर

राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा यांच्यातर्फे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेआधी ठरल्याप्रमाणे सर्व गटातील विजेत्यांना अमनोरातर्फे रोख बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. यामध्ये सुवर्णपदक विजेत्याला २० हजार, रौप्यपदक विजेत्याला १० हजार आणि कांस्यपदक विजेत्याला ५ हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. मात्र हर्षवर्धनचे प्रशिक्षक काका पवार यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाला दीड लाखाचं इनाम तर उप-विजेत्या मल्लाला ७५ हजारांचं इनाम जाहीर करण्यात आलं होतं.

काय म्हणाले काका पवार??

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत, आम्हाला विजेत्या खेळाडूंना खूप पैसे मिळतील असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात २० हजारांहून अधिक कोणताही पैसा हर्षवर्धनला मिळाला नसल्याचं काका पवार म्हणाले.

कुस्तीगीर परिषद काय म्हणते आहे…

२ ते ७ जानेवारी, २०२० दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा सर्व खर्च यंदा पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक सिटी कॉर्पोरेशनने उचलला होता. ज्यामध्ये प्रत्येक वजनी गटातील सुवर्ण पदक विजेत्यास २० हजार, रौप्य पदक विजेत्यास १० हजार व कांस्य पदक विजेत्यास ५ हजार रोख बक्षिस देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे स्पर्धेदरम्यान झालेल्या प्रत्येक बक्षिस समारंभात बक्षिसाची रक्कम अदा करण्यात आली आहे. स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी विजेता व उपविजेता मल्लास त्या व्यक्तीरिक्त कोणत्याही प्रकारची अधिक बक्षिसे जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या संबंधीची कोणतीही अधिकृत घोषणाही करण्यात आली नव्हती.

ललित लांडगे, कार्यालयीन सचिव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद