भारत दौऱयावर येण्याआधीच इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतग्रस्त झाल्याने तो भारत दौऱयाला मुकणार आहे. काऊंटी क्रिकेटमधील एका सामन्यादरम्यान मार्क वूडच्या घोट्याला दुखापत झाली. एका वर्षात वूडला तब्बल तिसऱयांदा घोट्याची दुखापत झाली आहे. याच दुखापतीमुळे वूडला बांगालदेश दौऱयातून देखील माघार पत्कारावी लागली. पण भारत दौऱयाआधी दुखापत बरी होईल, अशी वूड आणि संघ व्यवस्थापनाला आशा होती. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याची दुखापत बळावली.
वूडची संघातील अनुपस्थिती हा इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का आहे. इंग्लंडचा संघ भारताविरोधात पाच कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी क्रिकेटसाठी वूड हा इंग्लंडच्या संघासाठी खूप महत्त्वाचा गोलंदाज आहे. पाच कसोटी सामन्यांसोबतच इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने देखील खेळणार आहे.