NZ vs PAK, Finn Allen: न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज फिन अ‍ॅलन याने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने तब्बल १६ षटकार मारत न्यूझीलंडला सामना एकहाती जिंकवून दिला. न्यूझीलंडने पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-०ने जिंकत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. अ‍ॅलनने एका डावात १६ षटकार मारत विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. बुधवारी ड्युनेडिनमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ ६२ चेंडूत १३७ धावा करत अ‍ॅलनने विक्रमांच्या यादीत आपले नाव नोंदवले.

अ‍ॅलन शतक करत तो आता न्यूझीलंडकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक खेळी करणारा फलंदाज बनला आहे. या खेळीच्या जोरावर त्याने ब्रॅडंन मॅक्क्युलमच्या १२३ धावांच्या सर्वोत्तम खेळीला मागे टाकले, जी टी-२० मधील कोणत्याही किवी खेळाडूची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या आहे. यासह त्याने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

RCB's unwanted record
GT vs RCB : गुजरातविरुद्धच्या विजयानंतरही आरसीबीने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत पंजाब किंग्जची केली बरोबरी
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

अफगाणिस्तानचा हजरतुल्ला झाझाईने याआधी १६ षटकारांचा विक्रम केला होता, तो या यादीत अव्वल आहे. आता फिन अ‍ॅलननेही १६ षटकार मारत त्या यादीत स्थान मिळवले आहे. हजरतुल्ला झझाईने फेब्रुवारी २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात ६२ चेंडूत १६२ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ११ चौकार आणि १६ षटकार मारले. आता फिन अ‍ॅलननेही तेवढ्याच चेंडूंत १३७ धावा केल्या आहेत. त्याने पाच चौकार आणि १६ षटकार मारले. मात्र, आयर्लंड आणि पाकिस्तानच्या गोलंदाजीत खूप मोठा फरक आहे. अशा स्थितीत अ‍ॅलनची खेळी खूप खास मानली जात आहे.

या खेळीदरम्यान अ‍ॅलनने हारिस रौफच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. या फलंदाजाने रौफच्या एका षटकात तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने २७ धावा कुटल्या. त्याच्या खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानसमोर २२५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवण्यात यशस्वी ठरला. हा सामना ४५ धावांनी जिंकून न्यूझीलंडने मालिका जिंकली. किवी संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

हेही वाचा: Rishabh Pant: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! ऋषभ पंतने दिले पुनरागमनाचे संकेत, नेटमध्ये केली फलंदाजी

डेव्हॉन कॉनवे सात धावांवर लवकर बाद झाल्यानंतर अ‍ॅलनने टीम सेफर्टसह दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. आक्रमक अ‍ॅलनला स्ट्राइकवर ठेवण्यासाठी सेफर्टने फक्त त्याला साथ दिली. त्याने धावा काढण्यावर लक्ष केंद्रित करत सहाय्यकाची भूमिका बजावली. अ‍ॅलनच्या खेळीदरम्यान अंपायरने तीन वेळा चेंडू बदलला, यावरून तो किती ताकदीने चेंडू मारत होता, हे समजू शकते. अ‍ॅलनची शानदार खेळी १८व्या षटकात संपुष्टात आली. जमान खानच्या एका ऑफ कटर चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. पाकिस्तानी खेळाडूंनी यावेळी खेळ भावना दाखवत त्याचे कौतुक केले.

टी२० मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

फलंदाजधावाचेंडूचौकारषटकारसंघकोणत्या देशविरुद्ध?
हजरतुल्ला झाझाई१६२६२१११६अफगाणिस्तानआयर्लंड
फिन अ‍ॅलन१३७६२१६न्यूझीलंडपाकिस्तान
झीशान कुकीखेल१३७49१५हंगेरीऑस्ट्रिया
एजे फिंच१५६६३१११४ऑस्ट्रेलियाइंग्लंड
एच. जी. मनसी१२७५६१४स्कॉटलंडनेदरलँड