जिनिव्हा : पॅरिस ऑलिम्पिकमधील ‘ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड’ प्रकारातील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्यास रोख ५० हजार डॉलरचे पारितोषिक देण्याच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या निर्णयास अन्य देशांच्या ऑलिम्पिक संघटनांकडून विरोध होत आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी गेल्याच आठवडयात ही महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) कधीच रोख पारितोषिक देत नाही. खेळाडूंना त्यांच्या देश आणि राज्याकडून रोख पारितोषिके दिली जातात. अर्थात, असा निर्णय प्रत्येक देश किंवा राज्य घेत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे को म्हणाले होते.

हेही वाचा >>> IPL 2024: राहुल-क्विंटन चेन्नईला पडले भारी, लखनौचा दणदणीत विजय

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympic sports bodies criticize on cash prizes by athletics organizations zws
First published on: 20-04-2024 at 02:16 IST