कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर आज इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना चांगलेच गोत्यात आणले. त्यामुळे भारतावर डावाने पराभव होण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, आर. अश्विनच्या ८३ धावांच्या दमदार खेळीमुळे भारतावर डावाने ओढवलेला पराभव टळला. चौथ्या दिवसअखेर भारत ९ बाद २३९ अशा स्थितीत आहे. दिवसाचा खेळ संपला त्‍यावेळी आर. अश्विन ८३ आणि प्रग्यान ओझा ३ धावांवर खेळत होते. उद्या (रविवार) सकाळी ते पुन्हा मैदानावर उतरतील. अश्विनने इशांत शर्मासोबत ३८ धावांची भागीदारी केल्याने भारताला ३२ धावांची आघाडी मिळाली आहे.      
भारताचे सर्वच्या सर्व दिग्गज फलंदाज आज आपली चमक दाखवण्यात अपयशी ठरल्यानंतर भारताचा डावाने फराभव होतो की काय, असं वाटत असतानाच अश्निनच्या झुंझार खेळीमुळे आजचा पराभव उद्यावर गेला आहे.
दुपारच्या सत्रामध्ये विराट कोहली (२०), झहीर खान (०), कर्णधार महेंद्र सिंग धोनी (०), युवराज सिंग (११), इशांत शर्मा (१०) धावा करून एकामागोमाग बाद झाले. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या अवघ्या २०७ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया पुरती ढासळली. दरम्यान, आर. अश्विनच्या खेळीमुळे भारताला चमत्कारीक विजयाची आशा आहे.