scorecardresearch

Pro Kabaddi League : रोमांचक सामन्यात यूपी योद्धाची तमिळ थलायवाजवर ४१-३९ अशी सरशी!

दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सनं तेलुगू टायटन्सला मात दिली.

Pro Kabaddi League : रोमांचक सामन्यात यूपी योद्धाची तमिळ थलायवाजवर ४१-३९ अशी सरशी!
प्रो कबड्डी लीग

प्रो कबड्डी लीगमध्ये (PKL 8) आज, यूपी योद्धाने तमिळ थलायवाजचा ४१-३९ असा पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. यूपी योद्धाच्या संघाने गुणतालिकेत मोठी झेप घेतली. यूपीचा स्टार रेडर परदीप नरवाल अखेर फॉर्ममध्ये परतला आणि त्याने जबरदस्त सुपर १०ची कमाई केली. या मोसमातील त्याची हा पाचवा सुपर १० आहे.

पूर्वार्धानंतर तमिळ थलायवाजने यूपी योद्धाविरुद्ध २२-२० अशी आघाडी घेतली. सामन्याच्या सुरुवातीला अजिंक्य पवारला नक्कीच गुण मिळत होता, पण परदीप नरवालने पहिला सुपर रेड टाकताना तीन गुण मिळवले. उत्तरार्धाच्या सुरुवातीला सुमितने सुपर टॅकल करत यूपी योद्धाला ऑलआऊटपासून वाचवले. यानंतर यूपी योद्धाने गुण मिळवणे सुरूच ठेवले. सामन्याच्या २६व्या मिनिटाला यूपी योद्धाने तामिळ थलायवाजला दुसऱ्यांदा ऑलआऊट केले.

हेही वाचा – IPL 2022 Mega Auction : कधी, कुठे, केव्हा होणार महालिलाव? वाचा एका क्लिकवर!

तमिळ थलायवाजचा कर्णधार मनजीतनेही यादरम्यान सुपर १० पूर्ण केला आणि पुढच्याच चढाईत यूपी योद्धाच्या सुरेंदर गिलनेही सुपर १० पूर्ण केला. युपी योद्धाने महत्त्वपूर्ण टप्प्यावर त्यांच्या संघाची आघाडी वाढवली आणि सामना जिंकला. या सामन्यातून तमिळ संघाला फक्त एक गुण मिळाला.

दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने तेलुगू टायटन्सला ३४-३२ अशी मात दिली. गुजरातकडू राकेश सुंगरोयाने चढाईत ८, तर गिरीश ऐर्नाकने बचावात ५ गुणांची कमाई केली. तेलुगू संघाकडून रजनीश दलालने १० गुण मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2022 at 21:53 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या