वृत्तसंस्था, टोरंटो

भारताच्या पुरुष ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंनी ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत दर्जेदार कामगिरीची नोंद केली. नाशिककर विदित गुजराथी आणि आर. प्रज्ञानंद यांना चमकदार विजय मिळवण्यात यश आले, तर डी. गुकेशने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या हिकारू नाकामुराला बरोबरीत रोखत गुणतालिकेतील संयुक्त अग्रस्थान राखले.

indian chess players performance in candidates chess
ऐतिहासिक सांगतेकडे..
Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
d. gukesh
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेशची विदितवर मात
gukesh d won chess candidates 2024 become youngest ever world championship contender zws
अन्वयार्थ : गुकेशची बुद्धिझेप!

गुकेशपाठोपाठ प्रज्ञानंदनेही अझरबैजानच्या निजात अबासोवला नमवण्यात यश मिळवले. अबासोवला या स्पर्धेत सर्वात खालचे मानांकन मिळाले आहे. पाचव्या फेरीत त्याने गुकेशला ८७व्या चालीपर्यंत झुंजवले होते, पण सहाव्या फेरीच्या लढतीत प्रज्ञानंदला तो फारशी टक्कर देऊ शकला नाही. प्रज्ञानंदने ४५ चालींत विजय मिळवला. त्यापूर्वी विदितने स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद करताना फ्रान्सच्या अलिरेझा फिरुझाला ४० चालींमध्ये पराभूत केले. तसेच गुकेशने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना नाकामुराविरुद्ध बरोबरी नोंदवली. यासह त्याने गुणतालिकेतील संयुक्त आघाडी कायम राखली आहे.

हेही वाचा >>>Surya is Back: अशक्य वाटणारा फटका ‘मसल मेमरी’मुळे खेळतो! सूर्यकुमार यादवनं सांगितलं यशाचं कारण

सहा फेऱ्यांअंती गुकेश आणि गेल्या दोन ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील विजेत्या इयान नेपोम्नियाशी यांचे प्रत्येकी चार गुण आहेत. प्रज्ञानंद आणि अमेरिकेचा फॅबियानो कारुआना प्रत्येकी ३.५ गुणांसह संयुक्त तिसऱ्या, तर विदित आणि नाकामुरा प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्त पाचव्या स्थानी आहेत.

अबासोवविरुद्ध पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या प्रज्ञानंदचे सुरुवातीपासूनच पारडे जड मानले जात होते. त्यानेही चाहत्यांना निराश केले नाही. या लढतीत प्रज्ञानंद तांत्रिकदृष्टय़ा फारच सक्षम दिसला. लढतीच्या मध्यात दोन्ही खेळाडूंनी वजिरांची आदलाबदल केली. मात्र, त्यानंतर प्रज्ञानंदने झटपट, पण अचूक चाली रचत नवा वजीर बनविण्यात यश मिळवले. अखेर ४५व्या चालीत अबासोवने हार मान्य केली.

हेही वाचा >>>IPL 2024: मुंबईनं केली आरसीबीची धुळधाण; बुमराहचा फायफर, ईशान- सूर्याच्या धडाक्यापुढे बंगळुरू गारद

महिला विभागातील सहाव्या फेरीत भारताच्या पदरी निराशा पडली. प्रज्ञानंदची थोरली बहीण आर. वैशालीला रशियाच्या अनुभवी कॅटेरिना लायनोकडून, तर ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला चीनच्या ले टिंगजीकडून हार पत्करावी लागली.

सहाव्या फेरीचे निकाल

खुला विभाग :

विदित गुजराथी (एकूण ३ गुण) विजयी वि. अलिरेझा फिरुझा (१.५), डी. गुकेश (४) बरोबरी वि. हिकारू नाकामुरा (३), आर. प्रज्ञानंद (३.५) विजयी वि. निजात अबासोव (१.५), इयान नेपोम्नियाशी (४) बरोबरी वि. फॅबियानो कारुआना (३.५).

महिला विभाग :

आर. वैशाली (२.५) पराभूत वि. कॅटेरिना लायनो (३.५), कोनेरू हम्पी (२) पराभूत वि. ले टिंगजी (३), टॅन झोंगी (४.५) विजयी वि. अ‍ॅना मुझिचुक (२), अलेक्झांड्रा गोर्याचकिना (४) विजयी वि. नुरग्युल सलिमोवा (२.५).

नाकामुरा (वय ३६ वर्षे) आणि गुकेश (१७ वर्षे) या यंदाच्या ‘कॅन्डिडेट्स’मधील सर्वात मोठय़ा आणि लहान खेळाडूंमधील सहाव्या फेरीची लढत बरोबरीत सुटली. नाकामुराने गेल्या वर्षी गुकेशला तीन वेळा पराभूत केले होते. त्यामुळे गुकेशने या वेळी सावध खेळ केला. मात्र, त्याला बरोबरी नोंदवण्यात यश आले. दुसरीकडे, विदितने एका प्याद्याची लालूच दाखवून अलिरेझा फिरूझाला सापळय़ात पकडले आणि गेले अनेक दिवस हुलकावणी देणारा विजयश्री खेचून आणला. २०२२ सालच्या ‘कॅन्डिडेट्स’मध्ये मॅग्नस कार्लसनला अलिरेझाकडून फार अपेक्षा होत्या, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली त्या वेळी अलिरेझाने निराशा केली होती आणि या वर्षीही असेच चित्र कायम राहिले आहे. महिला विभागात सर्वच डाव निकाली झाले, पण हम्पी आणि वैशालीने पार निराशा केली. या दोघींनाही सहज बरोबरी साधता आली असती, पण ऐनवेळी झालेल्या चुकांचा त्यांना फटका बसला.  – रघुनंदन गोखले, बुद्धिबळ प्रशिक्षक.