महिलांच्या क्रिकेट हंगामाला मार्चमध्ये प्रारंभ

नवी दिल्ली : भारतीय क्रि के ट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रविवारी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीमध्ये देशातील प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रि के ट स्पर्धेचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. मात्र महिलांच्या क्रि के ट हंगामाला मार्चमध्ये प्रारंभ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

करोनाच्या साथीमुळे देशांतर्गत क्रिकेट हंगाम यंदा दिरंगाईने सुरू झाला आहे. सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रि के ट स्पर्धा सुरू आहे. रणजी करंडक स्पर्धेबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु याबाबत योग्य तोडगा निघू शकला नाही. ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा रणजी स्पर्धेसाठी आग्रही होता.

‘‘रणजी करंडक स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी अधिक आव्हानात्मक ठरू शकेल. याचप्रमाणे विजय हजारे करंडक स्पर्धेचे आयोजनही कठीण जाईल. त्यामुळे तूर्तास हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. रणजी करंडक किं वा हजारे करंडक या दोनपैकी एकच स्पर्धा होऊ शके ल. हा निर्णय येत्या आठवडय़ाच्या उत्तरार्धात होण्याची दाट शक्यता आहे. इंडियन प्रीमियर लीग मात्र मार्च-एप्रिल महिन्यातच खेळवण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

महिलांसाठी देशांतर्गत क्रि के ट हंगामासह श्रीलंका आणि इंग्लंडचे महिला संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. याचप्रमाणे विश्वचषक स्पर्धासाठीच्या करसवलतीच्या मुद्दय़ावर ‘बीसीसीआय’ केंद्र सरकारकडे आपली बाजू मांडणार असल्याचे बैठकीत ठरले.