दक्षिण आफ्रिकेत २००३ साली पार पडलेल्या वन-डे विश्वचषकाचा अंतिम सामना कोणताही भारतीय क्रिकेट प्रेमी विसरणार नाही. अंतिम फेरीत रिकी पाँटींगच्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावलं होतं. रिकी पाँटीगने अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई करत चौफेर फटकेबाजी केली होती. अपेक्षेप्रमाणे भारताला हे आव्हान पेलवता आलं नाही. मात्र या अंतिम सामन्यानंतर अनेक अफवांना पेव फुटलं होतं. या सर्व अफवांमध्ये रिकी पाँटीगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती आणि त्यामुळेच चेंडू इतक्या लांब जात होता अशी चर्चा सुरु होती. रिकी पाँटीगने जुन्या आठवणींना उजाळा देताना, २००३ साली अंतिम सामन्यात वापरलेल्या बॅटचा फोटो पोस्ट केला. Given we've all got a bit of time on our hands as we stay at home, thought I'd go through what I've kept from my career and share some of it with everyone on a regular basis - this is the bat I used in the 2003 World Cup final. pic.twitter.com/meoBP6NJvg— Ricky Ponting AO (@RickyPonting) March 23, 2020 मात्र भारतीय चाहत्यांनी या फोटोवर, आपली बऱ्याच वर्षांपासूनची शंका पाँटींगला विचारली. Every Indian from 90's will be searching for the spring in the bat— Ashirwad Karande (@AshirwadKarande) March 23, 2020 Cut it open we indians think it has springs in it — Wash Hands + Isolate (@AshaVaadi) March 23, 2020 It seems there was some spring in your bat Is it true sir?— R A T N I $ H (@LoyalSachinFan) March 23, 2020 Did u used spring in ur bat in 2003 WC final???-Every indian fan@RickyPonting— Gunju1910 (@gunjugandhi19) March 23, 2020 I think it’s time for some hard questions, Punter. Did this bat have spring inside it?— Vishnu Prasad (@weshnoo) March 23, 2020 pic.twitter.com/9ymGNYTZ1k— A. (@Punteresque) March 23, 2020 Spring kidhar hai ? pic.twitter.com/pIDgJctKEA— Right Arm Over (@RightArmOver_) March 23, 2020 No Indian can forget this bat— Tapan Joshi (@tapanjoshi28) March 23, 2020 अंतिम सामन्यात केवळ दोन बळी गमावत ऑस्ट्रेलियाने ३५९ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल भारताचे फलंदाज ४० षटकांत २३४ धावांपर्यंत मजल मारु शकले. साखळी फेरीपर्यंत चांगली कामगिरी करणारे भारतीय फलंदाज अंतिम सामन्यात पुरते अपयशी ठरले होते. यानंतर भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर विश्वचषक जिंकला होता.